मुंबईः दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक करण्यात ओशिवरा पोलिसांना यश आले आहे. सिताराम सिंह आणि विजय ऊर्फ पवन बलदेव सिंह अशी या दोघांची नावे असून ते दोघेही अनुक्रमे विरार आणि अंधेरीतील रहिवाशी आहेत. या कारवाईदरम्यान त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यांची ओळख पटली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून मुख्य आरोपीविरोधात चोरीचे किमान सहा गुन्हे दाखल आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोगेश्वरी परिसरात सराईत आरोपी घातक शस्त्रांसह दरोडा घालण्यासाठी येणार असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने साध्या वेशात जोगेश्वरीतील न्यू लिंक रोड, पाटलीपूत्रकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाळत ठेवली. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास तेथे चार तरुण आले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना पाहताच ते चौघेही पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून पळणाऱ्या दोघांना पकडले. या दोघांकडून पोलिसंनी एक पाना, पाचहून विविध आकाराचे कैचीचा भाग, स्क्रू ड्राव्हर, मिरचीची पूड, कैची आदी मुद्देमाल जप्त केला. चौकशीत त्यांचे नाव सिताराम सिंह आणि पवन सिंह असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरोधात दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे व भारतीय हत्यार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन्ही आरोपींना ओशिवरा पोलिसांनी अटक केली. सिताराम सिंह हा विरार येथे राहत असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात पाच घरफोडी, दहिसर पोलीस ठाण्यात एक अशा सहा गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी विरार, मिरा रोड व उत्तर मुंबई परिसरात चोऱ्या करायचे. त्यांच्या अटकेमुळे आणखी गुन्हेही उघड होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुंबई : प्रवाशाकडून तिकीट तपासनीसला मारहाण, बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा – विकासकांना बांधकामाचे गुणवत्ता हमी प्रमाणपत्र बंधनकारक, महारेराच्या संकेतस्थळावर प्रमाणपत्र प्रसिद्ध करावे लागणार

पोलिसांच्या कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे तीन साथीदार आर. के सिंह आणि समीर सिंह आणि रघु सिंह पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सिताराम सिंह आणि पवन हे त्यांच्या तीन साथीदारांसोबत जोगेश्वरी परिसरात दरोडा घालण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र दरोड्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two people who were preparing for the robbery were arrested the three ran away mumbai print news ssb