रंगांमुळे डोळ्यांची जळजळ झाल्याने दोघांना सोमवारी संध्याकाळी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एंजल जनगेल (७) आणि गणेश चव्हाण (२८) अशी या दोघांची नावे असून त्यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले. भांग सेवनामुळे त्रास झालेल्या सोनु सिंग (१८) याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. एकमेकांवर रंगांची उधळण करताना जखमी झालेल्या चौघांना नायर रुग्णालयात उपचार करुन घरी पाठविण्यात आले. तर हाताचे हाड मोडल्यामुळे एका २८ वर्षीय युवकाला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader