मुंबई : वरळी येथे रविवारी दुपारी एका मोटरगाडीने दिलेल्या धडकेत बस थांब्यावर उभे असलेले दोघे जण जखमी झाले. या अपघातात मोटरगाडीमधील चौघेही किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यात सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. पण बस थांब्यावर उभ्या दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे.
u
रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वेगात असलेली मोटरगाडी वरळीच्या नेहरू तारांगण थांब्यावर जाऊन धडकली. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या दोघांना दुखापत झाली. अजय शहा (६७) यांना व मनोज चौधरी (५०) यांचा अशी जखमींची नाव आहेत. त्यातील चौधरी यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय कारमधील चौघेजण देखील जखमी झाले. या जखमींवर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून वरळी पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.