मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते पेण तालुक्यातील कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांतील ८४ किलोमीटर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १० सप्टेंबपर्यंत एक मार्गिका सुरू होईल, तर डिसेंबरअखेपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होऊन या महामार्गावरील वाहतूक सुरू होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चव्हाण यांनी शनिवारी मुंबई ते गोवा या महामार्गाच्या पनवेल ते नागोठण्यापर्यंतच्या कामाची पाहणी केली. कासूपासून पुढे कामाची गती वाढविण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.