जे.जे. जंक्शन येथील बॅग विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी दोन आरोपी पोलिसांना सर जे.जे. मार्ग पोलिसांनी शनिवारी अटक केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील वर्तक आणि पोलीस शिपाई विजय गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. या दोघा पोलिसांनी विक्रेत्याकडून ५० हजारांची खंडणी मागितली होती. तडजोडीनंतर १० हजार रूपये घेतले असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- बांधकाम व्यावसायिकाला धमकी देत पैशांची मागणी; गुंडाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

तक्रारदार हेमेंद्र पटेल आणि त्यांचा चुलत भाऊ प्रतीक पटेल व्यवसायानिमित्त सांगलीमधील इचलकरंजी येथे २ ऑक्टोबर रोजी गेले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते मुंबईतील जे.जे. जंक्शन या ठिकाणी आले. यावेळी त्यांच्याजवळ ते विक्री करत असलेल्या मौल्यवान खड्यांची बॅग होती. तसेच काही रोख रक्कम होती. तक्रारदार त्यांच्या घरी जात असताना दोन गणवेशधारी पोलीस त्यांच्याजवळ आले. त्यांनी तक्रारदारांच्या वस्तूंची पाहणी केली. तसेच, मौल्यवान खडे कुठून आणले, याबाबत विचारणा केली. त्यानंतर दोन्ही पोलिसांनी बळजबरीने तक्रारदाराला पोलिसांच्या गाडीत बसवले व सुखरूप सोडून देण्यासाठी ५० हजारांची मागणी केली. तडजोड करून १० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.

हेही वाचा- अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन करणं कॅब चालकाला भोवले, २४ तासांच्या आत पोलिसांकडून बेड्या

घटनेनंतर तक्रारदार यांनी मुंबई पोलीसांच्या ट्वीटर खात्यावर याबाबत माहिती दिली. तसेच पोलीस ठाण्यात येऊन तक्रारही दाखल केली. सर जे. जे. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी सुनील वर्तक आणि विजय गायकवाड यांच्याकडून गुन्ह्यातील मालमत्ता ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे, अशी माहिती सर जे. जे. मार्ग पोलिसांनी दिली.