पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान असलेले फाटक क्रमांक २४ तर मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान असलेले फाटक क्रमांक नऊ ही दोन्ही फाटके दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आली आहेत.
पश्चिम रेल्वेवरील फाटक २२ फेब्रुवारीच्या रात्रीपासून ते १३ मार्चच्या पहाटे सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवरील फाटक २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानचे नऊ क्रमांकाचे फाटक बंद असले तरी प्रवाशांनी सात क्रमांकाच्या फाटकाचा उपयोग करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
प्रगती एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ
मुंबई-पुणे दरम्यान पनवेलमार्गे जाणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसला जादा वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ही डब्यांची संख्या वाढविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. वातनुकूलित चेअर कारचा हा डबा कायमस्वरूपी जोडण्यात आला आहे.
पश्चिम- मध्य रेल्वेवरील दोन फाटक बंद
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान असलेले फाटक क्रमांक २४ तर मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान असलेले फाटक क्रमांक नऊ ही दोन्ही फाटके दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आली आहेत.
First published on: 25-02-2013 at 02:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two road crossing closed on western central railway