बांगलादेशातून बनावट नोटा आणून त्या वटविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने वांद्रे येथून अटक केली. त्यांच्याकडून तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
  वांद्रे येथील शासकीय वसाहतीत दोन इसम बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ८ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी मरिकुल उर्फ लुटू हजरुद्दिन शेख (२९) आणि मुस्तफा किस्मत शेख (४०) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे पाचशे आणि हजार रुपयांच्या तीन लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले की, मालदा तालुक्यातल्या बहादूरगाव, मालिया चौक आदी गावांमध्ये प्रामुख्याने बनावट नोटा विक्रीचा व्यवसाय चालतो. याप्रकरणी पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झाल्याचेही फटांगरे यांनी सांगितले.