मुंबई : मुंबई शहर भागात जूनपासून २३ सप्टेंबर या कालावधीत दोन हजार मि.मी., तर पश्चिम उपनगरांमध्ये २६१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. संपूर्म जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.हवामान खात्याच्या कुलाबा केंद्रात यंदा पावसाळ्यात २३ सप्टेंबरपर्यंत २०३७ मि.मी., तर सांताक्रूझ केंद्रात २,६१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र ऑगस्टमध्ये पुन्हा दमदार हजेरी लावत पाऊस बरसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवादरम्यानही पावसाचा मुक्काम कायम होता. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाचा मुक्काम कायम होता. काही भागात गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. देशात मोसमी पाऊस परतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.शुक्रवारी मुंबई शहर व उपनगरात साधारणतः ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.