मुंबई : क्षयरोगाच्या उपचारासाठी समर्पित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी क्षयरोग रुग्णालयात दिवसाला साधारण दोन ते तीन रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू होत आहे. मागील साडेतीन वर्षांत क्षयरोग रुग्णालयात ३ हजार १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाचे काम सुरू असल्याने आणि भूलतज्ज्ञ नसल्याने साडेतीन वर्षांत फक्त चार मोठ्या शस्त्रक्रिया झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी रुग्णालयात मागील साडेतीन वर्षांत तब्बल ३ हजार १८५ रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे. त्यात पुरुषांची संख्या २ हजार १२६ तर एक हजार ५९ महिलांचा समावेश आहे. २०२१ मध्ये ९७४ जणांचा मृत्यू झाला होता तर २०२२ मध्ये ९५९ रुग्णांचा मृत्यू झाला. २०२३ मध्ये ८५५ रुग्णांचा आणि मे २०२४ पर्यंत ३९७ जणांचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे. क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील काही वर्षांत काहीअंशी घट दिसून येत आहे. मात्र क्षयरोगाने साधारणपणे दिवसाला दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू होत आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Doctor aggressive after being beaten by relatives The pediatric department of VN Desai Hospital was closed by doctors Mumbai news
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल

हे ही वाचा…Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?

औषध संवेदनशील रुग्णांचे प्रमाण अधिक मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्येही औषध संवेदनशील (ड्रग सेन्सेटिव्ह) रुग्णांची संख्या औषध प्रतिरोधक (ड्रग रेसिस्टंट) रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. २ हजार २७७ औषध संवेदनशील रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला आहे तर औषध प्रतिरोधक (ड्रग रेसिस्टंट) असलेल्या ९०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा…मुंबई :मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला, पण एसटीला मिळालाच नाही

क्षयरोगावर घरी उपचार होत असल्याने एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यावरच त्याला रुग्णालयात आणले जाते. अनेक रुग्णांमध्ये प्राणवायूची मात्रा कमी असते. त्यांना गोळ्यांची मात्रा लागू होत नाही. मद्यापान, मधूमेह, एचआयव्ही यांसारखे अन्य आजारही त्यांना झालेले असतात. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांना वाचविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. औषध संवेदनशील रुग्ण हे बऱ्याचदा थोडासा आराम मिळाल्यानंतर औषधे घेणे बंद करतात. तसेच क्षयरोगाचे औषधे ही सलग सहा महिने घेणे आवश्यक असून रुग्ण मध्येच औषधे घेणे बंद करतात. परिणामी त्यांची प्रकृती अधिक बिघडते, अशी माहिती शिवडी क्षयरोग रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.