लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : शीव येथील सीजीएस वसाहतीनजीक मंगळवारी सकाळी ३०० मिमी तसेच ६०० मिमी व्यासाच्या दोन जलवाहिन्या फुटल्या. पालिकेच्या जल अभियंता विभागाने जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून दुरुस्तीच्या कामासाठी शीव कोळीवाडा, वडाळा तसेच आसपासच्या भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबई : गिर्यारोहणासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीला मारहाण करून लुटले

संबंधित जलवाहिन्यांची दुरुस्ती होण्यासाठी सुमारे २४ तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती जल अभियंता विभागाकडून देण्यात आली. या दुरुस्तीच्या कामासाठी सीजीएस वसाहत, महात्मा गांधी नगर, कोकरी आगर, भारतीय कमला नगर, विजय नगर, संगम नगर, दोस्ती एकर्स, हिम्मत नगर, शांती नगर, आझाद मोहल्ला, अंटोप हिल, वडाळा पूर्व, गणेश नगर, शिवशंकर नगर, नेहरू नगर, इंदिरा नगर, वडाळा ट्रान्झिट कॅम्प, पंजाबी कॉलनी, सेवा समिती, म्हाडा कॉलनी, शीव कोळीवाडा आदी भागांतील पाणीपुरवठा पूर्णतः खंडित करण्यात आला आहे. नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two water pipes burst at sion cutting off water supply to wadala and surrounding areas mumbai print news mrj