bike entered into actor Salman Khan’s convoy near galaxy apartment : दुचाकीवरून भरधाव वेगात अभिनेता सलमान खानच्या सुरक्षा ताफ्यात शिरलेल्या तरुणाला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी  दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार बुधवारी घडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सलमान खानचा ताफा त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी जात असताना, एका दुचाकीस्वार मेहबूब स्टुडिओ आणि गॅलेक्सी अपार्टमेंटदरम्यान सुरक्षा ताफ्यात शिरला. त्यामुळे सुरक्षा रक्षक सतर्क झाले. संशयित दुचाकीस्वार वेगातच सलमान  बसलेल्या मोटरगाडीजवळ गेला.सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून तो सलमानच्या गाडीजवळून जात होता, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

minor girl was assaulted and threatened to throw acid
मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अँसिड फेकण्याची धमकी, ६० वर्षीय व्यक्तीला अटक
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
cyber crime
New Cyber Fraud: मोबाइलच्या किपॅडवर ‘शून्य’ दाबताच लाखोंचा गंडा; या सायबर स्कॅमपासून सावध व्हा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Anna Sebastian Death EY Company First Reaction
Anna Sebastian : अ‍ॅना सेबेस्टियनच्या मृत्यूमुळे खूप वाईट वाटलं, आम्ही …, EY कंपनीचं स्पष्टीकरण, आईने केला होता ‘ओव्हरवर्क’चा आरोप
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
lebanon walkie talkies blasts
Lebanon Walkie Talkies Blasts : लेबनानमधील स्फोटानंतर वॉकीटॉकी बनवणाऱ्या जपानी कंपनीकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “आम्ही २०१४ नंतर…”

शेवटी, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जवळच गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला माहिती दिली आणि दुचाकीस्वाराला गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर अडवले. चौकशीत त्याचे नाव उझैर मोहीउद्दीन (२१) असल्याचे समजले.  तो वांद्रे  (पश्चिम) येथील महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे उघड झाले.

हेही वाचा >>> ‘खनिज क्षेत्र’ निधीतून मिक्सर, टॅबचे वाटप; खाणकाम उद्योगाने बाधित झालेल्यांचा निधी इतरत्र वळवण्यास विरोध

मोहीउद्दीनविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम  १२५ (इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारे कृत्य) आणि २८१ (बेफिकीरपणे वाहन चालवणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, असे  वांद्रे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

वांद्रे येथील घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने अभिनेता सलमान खानचा जबाब नोंदवला.गोळीबार झाला त्यावेळी  सलमान खान घरीच  होता. याप्रकरणात साक्षीदार म्हणून सलमानचा जबाब गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवला. त्याच्या राहत्या घरी  जबाब नोंदवण्यात आला. सलमान चित्रीकरणासाठी परदेशात होता. त्यामुळे एवढे दिवस त्याचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. अखेर बुधवारी त्याच्या घरी जाऊन गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा जबाब नोंदवला.  त्याला यापूर्वी आलेल्या धमक्यांची माहिती विचारण्यात आली. तसेच सुरक्षेबाबतही विचारपूस झाली. याप्रकरणातील मुख्य आरोपी परदेशात असून टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोईही सध्या कारागृहात आहे. लवकरतच गुन्हे शाखा त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे. याप्रकरणात सलमान खानचा जबाब महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

हेही वाचा >>> मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अँसिड फेकण्याची धमकी, ६० वर्षीय व्यक्तीला अटक

यापूर्वी सलमानच्या घरावर गोळीबाराची घटना

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार झाला होता. त्याप्रकरणी कुख्यात लॉरेन्स बिष्णोईसह त्याचा भाऊ अनमोल बिष्णोईसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १४ एप्रिल रोजी, सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुजरातमधून अटक केली होती. त्यांना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाषचंदर बिष्णोई (३७) व अनुज थापन (३२) यांना पंजाब येथून अटक करण्यात आली होती. बिष्णोई टोळीकडून दोन्ही आरोपींना दोन पिस्तुल व ४० काडतुसे पुरवण्यात आली होती. ती पिस्तुले देण्यासाठी चंदर व थापन १५ मार्च रोजी पनवेलला आले होते. ते पनवेलमध्ये तीन तास थांबले होते. त्यावेळी त्यांनी सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता व सागर पाल यांना पिस्तुल दिले होते. याप्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. त्याशिवाय टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई व त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अनमोल बिष्णोईविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते.

सलमानच्या वडिलांनाही लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकावले

अभिनेता सलमान खानचे वडील व प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना एका बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकावल्याचे उघडकीस आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान बुधवारी मॉर्निग वॉकला गेले होते. त्यावेळी एक दुचाकी त्याच्याजवळ आली व त्यातील  एका बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने धमकी दिली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दुचाकीस्वार व अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीसी टीव्हीच्या मदतीने तपास सुरू आहे.