पैशांची पिशवी घेऊन चाललेल्या एका व्यापाऱ्यावर अज्ञात दुचाकी स्वारांनी गोळीबार केल्याची घटना कल्याणमधील गोविंदवाडी येथे घडली. नागरिकांनी दुचाकी स्वारांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.
मुनीर शेख हे व्यापारी ८५ हजार रुपये पिशवीतून घेऊन बाजार समितीत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मुनीर यांच्या हातामधील पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मुनीर यांनी ओरडा करताच नागरिक जमा झाले. दुचाकी स्वारांनी हवेत गोळीबार करून पलायन केले. बाजारपेठ पोलीस याप्रकरणाचा तपास करीत
आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा