अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना गुन्हे शाखा परिमंडळ ६ मधील अधिकाऱ्यांनी चेंबूरमधून अटक केली. अटक आरोपींमध्ये बाळाची माता आणि अन्य एका महिलेचा समावेश असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “जे शिंदे-फडणवीसांसमोर झुकले नाहीत ते…”; ‘शिवसेना फोडण्यासाठी ‘ईडी’चा वापर’ झाल्याचा आरोप करत ठाकरेंकडून हल्लाबोल

चेंबूरच्या गायकवाड नगर परिसरात दोन महिला एका नवजात बालकाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा परिमंडळ ६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंके यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी परिसरात सापळा रचला. त्यानुसार या ठिकाणी दोन नवजात बालिकांसह घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी तत्काळ या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींमध्ये नवजात बालिकेची माता आणि अन्य एका महिलेचा समावेश असून दोघीही गोवंडी परिसरातील रहिवासी आहेत. दोन्ही महिलांवर देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two women arrested for selling newborn babies crime news mumbai print news amy