Two women killed in Mumbai Bulding Fire : मुंबईतील मस्जिद बंदर परिसरातील एका ११ मजली उंच इमारतीला आग लागल्याच्या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत इतर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आणि जखमी महिलांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर परिसरातील पन्ना अली मॅन्शन या इमारतीत ही आग लागली. जखमींना तातडीने सरकारी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कॉमन पॅसेजमध्ये बसवलेल्या मीटर बॉक्समध्ये इलेक्ट्रीक वायरिंगला ही आग लागली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होत.

दोन महिलांचा मृत्यू, दोन जण जखमी

या आगीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कॉमन पॅसेजमधील दोन महिलांना हात आणि पायांना दुखापत झाली. तसेच आगीनंतर पसरलेल्या धुरामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रासही झाला होता. साबीला खातून शेख (४२) आणि साजीया आलम शेख (३०) यांना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तर इमारतीच्या सहाव्या मजल्यावर असलेला एक व्यक्ती आणि आठव्या मजल्यावरील एका महिलेला या घटनेत गुदमरल्याचा त्रासाला सामोरे जावे लागले. यानंतर करिम शेख (२०) आण शाहिन शेख (२२) यांना तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

साडेसहाच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

Story img Loader