टिटवाळा नजीकच्या खडवली-भातसा नदीवर फिरण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही त्यांचे मृतदेह सापडत नसल्याने शोधकार्य सुरुच होते. मात्र, सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या दोघांचेही मृतदेह पोलिस आणि अग्निशामन दलाला मिळाले आहेत. त्यामुळे शोधकार्यही थांबवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांच्या माहितीनुसार, रामलखन मौर्य (वय २५) आणि अभिजीत भागवे (वय ३७) असे बुडालेल्या तरुणांची नावे असून हे दोघेही ठाण्याचे रहिवासी आहेत. टिटवाळ्याजवळच्या खडवली-भातसा नदीवर ते फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान, ते पाण्यात पोहायला उतरले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटकोपर आणि मानखुर्द येथील रहिवासी काल येथील पाण्यात बुडाले होते.