दिल्लीतील ‘उबर’ प्रकरणानंतर महाराष्ट्रातील ‘वे ब कॅब’ ऑपरेटर्सनी आपल्या ताफ्यातील सर्व चालकांची माहिती आणि पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र गुरुवारी दुपापर्यंत संबंधित प्रादेशिक परिवहन विभागांकडे जमा करायचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिल्यानंतर या सर्व टॅक्सी ऑपरेटर्सची लगबग सुरू होती. मात्र या सर्व कारवाईला जबाबदार असलेल्या उबर कंपनीच्या चालकांची माहिती वगळता इतर सर्व कंपन्यांनी आपापल्या चालकांची माहिती जमा केली आहे.
मुंबईत सुमारे चार हजार टॅब कॅब, १८०० मेरू, तीन हजारांहून अधिक बुक माय कॅब अशा १०-१५ हजार वेब कॅब आहेत. त्यापैकी टॅब कॅब, बुक माय कॅब, मेरू, कार्झऑनरेण्ट (इझी कॅब), प्रियदर्शिनी टॅक्सी, टॅक्सी फॉर शुअर, ओला, कॅबझो या सर्व ऑपरेटर्सनी आपल्याकडील चालकांची सर्व माहिती परिवहन विभागाकडे जमा केली आहे. मात्र उबर टॅक्सी या कंपनीकडे मुळातच अशा चालकांची माहिती नसल्याने त्यांना ती माहिती पूर्णपणे मिळवावी लागणार आहे. या कारणास्तव उबर टॅक्सीच्या संचालकांनी परिवहन विभागाकडे एका दिवसाची किंवा सोमवापर्यंतची मुदत मागून घेतली आहे. आपल्या कंपनीची सर्व माहिती हॉलंडमधील आपल्या सव्‍‌र्हरमध्ये आहे, असे सांगत या कंपनीने मुदतवाढ मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा