मुंबई : रविंद्र वायकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे ‘ईडी’ किंवा अन्य केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईच्या भीतीने सत्ताधारी भाजपला शरण जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. सत्ताधाऱ्यांना शरण गेल्यास कारवाईपासून दिलासा मिळतो हे यापूर्वी स्पष्ट झाल्याने अटकेपासून बचाव करण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या गोटात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

जोगेश्वरीतील पालिकेच्या भूखंडावरील क्बल आणि पंचतारांकित हॉटेलवरून ‘ईडी’ने वायकर व त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात कारवाई सुरू केली होती. या प्रकरणात स्वत: वायकर यांच्यासह त्यांची पत्नी आरोपी होती. वायकर यांची यापूर्वी ‘ईडी’ने चौकशी केली होती. वायकर व त्यांच्या पत्नीला अटक होणार अशीच अटकळ बांधली जात होती. सोमय्या यांनी तशी भविष्यवाणी वर्तविली होती.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले

हेही वाचा >>> राज्यातील ५०६ प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, लोकार्पण; पंतप्रधान मोदी यांची दृकश्राव्य माध्यमातून उपस्थिती

अटकेपासून बचाव करण्याकरिता वायकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरण गेले आहेत. त्यांच्या हॉटेलवरील कारवाईवर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात मुंबई महानगरपालिकेने वायकर यांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केले तेव्हाच वायकर हे शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते. पत्नी व आपल्याला अटक होणार या भीतीने गेले काही दिवस वायकर हे अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी सत्ताधाऱ्यांना शरण जाऊन अटकेपासून स्वत:ची सुटका करून घेतल्याचे ठाकरे गटाच्या एका नेत्याने सांगितले.  वायकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील नेते म्हणून गणले जात असत. अलिबागजवळ  उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि वायकर यांनी बेकायदेशीरपणे बंगले उभारण्याचा व त्यातून आर्थिक लाभ उकळण्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता. यावरून सोमय्या यांनी ठाकरे आणि वायकर यांच्या विरोधात ईडीपासून सर्वत्र तक्रारीही केल्या होत्या. अटकेपासून सुटका करून घेण्याकरिता वायकर यांनी वेगळी वाट पत्करली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्षपद हे महत्त्वाचे मानले जाते. उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे, रविंद्र वायकर आणि यशवंत जाधव यांच्याकडे वर्षांनुवर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद कायम ठेवले होते. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते आता शिंदे गटात  आहेत.

नेत्यांची लांबलचक यादी

अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, खासदार भावना गवळी, आनंदराव आडसूळ, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आदी नेत्यांनी ईडी किंवा अन्य यंत्रणांच्या कारवाईपासून सुटका करून घेण्याकरिताच सत्ताधारी पक्षाबरोबर गेले आहेत. भाजप किंवा शिंदे गटाबरोबर गेल्यास ईडीची कारवाई थंडावली आहे.  हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांनी  भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याच्या आरोपावरून या साऱ्यांची अटक अटळ होती. पण सत्ताधारी पक्षाबरोबर गेल्याने साऱ्यांच्या विरोधातील कारवाई थंडावली होती.

Story img Loader