लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. संपूर्ण देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात वीस टप्प्यात निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार असून मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होत असल्याबाबत विरोधकांनी मात्र टीका केली आहे. याआधी महाराष्ट्रात कधीही पाच टप्प्यात निवडणुका झाल्या नव्हत्या, असे काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. तर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना गाफील न राहण्याचे आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे यांची मुंबईतील डोंगरी शाखा येथे काल (दि. १६ मार्च) सभा झाली. “शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर मुंबईकर मराठी माणूस गावाला जातो. मुंबईत बरेच कोकणी आहेत. उन्हाळ्यात गावाकडे जाऊन आंबे, काजू यांचा आस्वास घेण्याचं काम मराठी माणूस करतो. पण तुम्ही २० तारखेला यांचे १२ वाजविण्यासाठी तुम्ही मुंबईत हवे आहेत. सुट्टी नंतरही घेता येईल, पण यांना आता सुट्टीवर पाठविण्याचे दिवस आले आहेत”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मी तर…”
गेल्या १० वर्षांत पाडा-पाडी, फोडा-फोडी केली
१० वर्षांत मोदी-शाहांनी काय केलं? याचा अहवाल प्रकाशित करावा. पण मला खात्री आहे, मागच्या १० वर्षांत देशातल्या कंपन्या विकल्या, कुटुंब फोडले, किती पक्ष फोडले, किती सरकार पाडले, अशी कर्मदरीद्री कामच या अहवालात असतील. गेल्या १० वर्षांत दुसऱ्यांच्या श्रेयावर धाड टाकण्याचं काम भाजपाने केले आहे.
सरकारी जाहिरातींच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग
महाराष्ट्र सरकारने सरकारी जाहीरातींसाठी ८५ कोटी आधीच दिले आहेत. जर आचारसंहिता लागलेली आहे. तर या सरकारी जाहिराती तात्काळ बंद झाल्या पाहीजेत. या जाहिरातींमध्ये सरकारच्या मंत्र्यांच्या चेहरे येत आहेत. राजकीय नेत्यांचे चेहरे या जाहिरांतीमध्ये येणार असतील तर जाहिरांतीचा खर्च सरकारी खर्चात न पकडता, तो या नेत्यांकडून वसूल करावा, असे जर होणार नसेल तर निवडणूक आयोगाने कारवाई करावी. निवडणूक आयुक्त किती कर्तव्यनिष्ठ आहेत, हे आम्ही पाहू, असाही इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.