सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी अंदाजे ३,४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केले आहे. सूरत डायमंड बोर्स (Surat Diamond Bourse) नावाच्या या डायमंड हब अशी बहुमजली इमारत तिथे उभी करण्यात आली आहे. गुजरातमध्ये बांधलेल्या सूरत डायमंड बोर्समुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मोठा धक्का बसणार आहे, कारण मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईत येणारे अनेक मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे गुजरातला गेले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्यातच आता मुंबईतला हिरे व्यापार गुजरातला नेला जात आहे. मुंबईतले अनेक हिरे व्यापारी गुजरातला स्थायिक होऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातलं शिंदे सरकार विरोधकांच्या रडारवर आहे.

केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करून मुंबईतले मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला नेत आहे, असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सातत्याने होत आहे. अशातच आता नवी मुंबईत होऊ घातलेला जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Kalyan Dombivli hawker removal chief suspended
कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांची, पाठराखण करणारा पथक प्रमुख निलंबित
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Roads Alibaug, MMRDA, Alibaug tourists,
अलिबागमधील दहा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणार, एमएमआरडीए ३२५ कोटी रुपये खर्च करणार, पर्यटकांना दिलासा
Raigad is engine of economic development in country after Mumbai due to IT industry says Devendra Fadnavis
आयटी उद्योगामुळे मुंबईनंतर रायगड हे देशातील आर्थिक विकासाचे इंजिन बनत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
dcm Devendra fadnavis Mumbai fintech city
मुंबई हे फिनटेक शहर बनवणार… – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
Devendra fadnavis latest marathi news
‘झोपु’ योजनांमुळे केंद्र सरकारची शेकडो एकर जमीन लवकरच खुली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा; नव्या गृहनिर्माण धोरणाचे संकेत
Piyush Goyal expressed concern over rapid expansion of e commerce companies in India
बहरते ‘ई-कॉमर्स’, साफल्य नव्हे चिंतेची बाब; गोयल

उदय सामंत म्हणाले, विधानसभेच्या मागच्या अधिवेशनात आम्ही एक श्वेतपत्रिका काढली होती. त्यातले तीन प्रकल्प बाहेर जाणार असल्याची बोंबाबोंब होत आहे. परंतु, त्यातला कुठलाही प्रकल्प गेलेला नाही. हे श्वेतपत्रिकेतून सिद्ध झालं नाही. वेदांता फॉक्सकॉनसारखा प्रकल्प आता गुजरातमध्ये तरी होतोय की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, मुंबईच्या जेम्स अँड ज्वेलरी पार्कबद्दल जे काही बोललं जातंय ते खोटं आहे. देशातला सगळ्यात मोठा जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा प्रकल्प नवी मुंबईत होत आहे. त्यात मोठी गुंतवणूक होणार असून या प्रकल्पाद्वारे राज्यात ५० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुंबईतल्या अंधेरी येथे जेम्स अँड ज्वेलरीचं मुख्यालय आहे. मी काही दिवसांपूर्वी तिथे जाऊन आलो. एखादा उद्योगपती त्याच्या उद्योगाच्या विस्तारासाठी गुजरातला गेला तर याचा अर्थ जेम्स अँड ज्वेलरीची पूर्ण यंत्रणा तिकडे गेली असं होत नाही. जेम्स अँड ज्वेलरीचा सर्वात मोठा प्रकल्प नवी मुंबईतच होईल.