सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी अंदाजे ३,४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केले आहे. सूरत डायमंड बोर्स (Surat Diamond Bourse) नावाच्या या डायमंड हब अशी बहुमजली इमारत तिथे उभी करण्यात आली आहे. गुजरातमध्ये बांधलेल्या सूरत डायमंड बोर्समुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मोठा धक्का बसणार आहे, कारण मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईत येणारे अनेक मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे गुजरातला गेले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्यातच आता मुंबईतला हिरे व्यापार गुजरातला नेला जात आहे. मुंबईतले अनेक हिरे व्यापारी गुजरातला स्थायिक होऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातलं शिंदे सरकार विरोधकांच्या रडारवर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा