काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच उद्धव आणि राज ठाकरे या चुलत बंधूंमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. राज ठाकरे यांनी फटकारल्याने विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे अस्वस्थ असतानाच त्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी सोमवारी दाखल झाले. दुसरीकडे ‘छुपा शत्रू कोण हे भाजपला कळले असेल’ अशा शब्दांमध्ये शिवसेनेने मनसेने बरोबर यावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या भाजपला चांगलाच टोला हाणला.
खडसे सकाळी विरोध करतात आणि सायंकाळी साटेलोटे करतात, असा आरोप राज ठाकरे यांनी केल्याने भाजपमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली. भाजप आणि मनसेतील जवळीक शिवसेनेला फारशी पसंत पडत नव्हती. राज यांनी खडसे यांना लक्ष्य करताच शिवसेनेने संधी साधली. उद्धव यांनी खडसे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. युतीची व्यूहरचना ठरविण्यासाठी बैठक होती, असे सांगण्यात आले.
राजकडून दुखावलेल्या खडसेंना उद्धवची मलमपट्टी
काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच उद्धव आणि राज ठाकरे या चुलत बंधूंमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. राज ठाकरे यांनी फटकारल्याने विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे अस्वस्थ असतानाच त्यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी सोमवारी दाखल झाले.
First published on: 12-03-2013 at 04:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav bandaging to khadse who upset on raj