मुंबई : ‘राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याबाबतीत आम्हाला सर्वानाच कमतरता जाणवत होती. उद्धव ठाकरे यांना अनुभव नसल्याने हे घडले असले तरी ते टाळता आले असते, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात व्यक्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राजकारणात सत्ता राखण्याकरिता वेगाने हाचचाली कराव्या लागतात. महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात ठाकरे यांनी माघार घेतली. शारीरिक अस्वास्थ्य हे त्यामागचे कारण असावे, असेही निरीक्षण पवार यांनी नोंदविले आहे. करोनाच्या काळात राष्ट्रवादीचे सारे मंत्री मैदानात सक्रिय होते. उद्धव ठाकरे हे प्रशासनाच्या संपर्कात होते, पण दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून. महाविकास आघाडीचे सरकार हे भाजपला देशभरात मिळालेले सर्वात मोठे आव्हान होते. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार याची कल्पना होती. आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेतच वादळ माजेल याचा अंदाज आला नव्हता. हा अंसतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेनेचे नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असेही पवार यांनी म्हटले आहे.
लोकांना वाचायला शिकले पाहिजे! शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
मंबई: सार्वजनिक जीवनात काम करताना लोकांमध्ये वावरायला पाहिजे. लोकांना वाचायला शिकले पाहिजे. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन झाले, या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पक्षाचे उपाध्यक्ष हेमंत टकले, प्रतिभा पवार, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. पवार यांनी भाषणात लहाणपणीच्या आठवणीपासून सुरुवात करत शालेय शिक्षण, पुण्यातील शिक्षण याचा धावता आढावा घेतला. सार्वजनिक जीवनातील प्रथम प्रवेशाबद्दल पवार यांनी आठवण सांगितली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर पहिल्यांदा विधानसभेचे तिकीट मिळाले. मी पहिल्यांदा आमदार झालो. त्यानंतर गेली ५६ वर्षे मी कोणत्याना कोणत्या सभागृहाचा नेता म्हणून आजतागायत राहिलो आहे. या सबंध काळात मी माणसे जोडायचे काम केले आहे. त्यामुळे मला माणसांमध्ये जायला आवडते, असेही पवार यांनी या वेळी सांगितले. पवार यांचे वाचनावर प्रेम आहे. त्यामुळे सकाळी सर्व वर्तमानपत्रे वाचून झाल्यावर पवार आपल्या कामाला सुरुवात करतात. ते जसे माणसे वाचत असतात तसेच पुस्तकेदेखील वाचत असतात, असे अरुण गुजराथी यांनी सांगितले.
काँग्रेसमुळेच अजित पवार अस्वस्थ होते
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याकरिता राष्ट्रवादीने पुढाकार घेतला असताना अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सरकारमध्ये सहभागी झाले हे धक्कादायक होते. ‘अजितने उचललेले पाऊल अत्यंत गैर होते व त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नव्हता’ हे मी उद्धव ठाकरे यांनाही कळविले होते. अजितने असा निर्णय का घेतला असावा याचा मी विचार केला तेव्हा काँग्रेससमवेत चर्चा फार काही निखळ स्वरूपाची नव्हती. काँग्रेस नेत्यांच्या आडमुठेपणामुळे चर्चेत रोज काही ना काही विघ्ने येत होती. काँग्रेसचा प्रतिसाद काहीसा अडेलतट्टू होता. अशाच एका बैठकीत माझा संयम सुटणे हे आमच्या नेत्यांसाठी आश्चर्याचे होते. अजित भावनाप्रधान आहे आणि तिरीमिरीत त्याने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त करीत पवार यांनी अजितदादांच्या बंडाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.
या बंडानंतर अजित पवार यांचा विषय पक्षांतर्गतबरोबर कौटुंबिकही होता. अजित यांचे बंधू श्रीनिवास त्यांच्या संपर्कात होते. त्यातून अजितची बंडाबाबतची भूमिका निवळायला लागली. माझी पत्नी प्रतिभा आणि अजितचे संबंध अत्यंत जिव्हाळय़ाचे आहेत. अजित याने माझ्या पत्नीची भेट घेऊन जे झाले ते चुकीचे होते आणि घडायला नको होते, अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा पडला होता, असेही पवार यांनी म्हटले आहे.