Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray Hospitalized at Reliance Hospital : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तब्येत बिघडली असून त्यांना विविध तपासण्या करण्यासाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. ते आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे शिवसैनिक चिंतेत आहत. धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. त्यांची अँजिओग्राफी देखील केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. याआधी त्यांची अँजिओप्लास्टी देखील झाली आहे. त्यामुळे डॉक्टर हार्ट ब्लॉकेजशी संबधित व हृदयाशी संबंधित इतर तपासण्या करत आहेत. अँजियोग्राफीमद्वारे हार्ट ब्लॉकेज तपासता येतात. अँजिओग्राफीत हार्ट ब्लॉकेज आढळले तर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी व इतर उपचार केले जाऊ शकतात.

bhopal 1800 crore drug case
धक्कादायक! १८०० कोटी रुपयांच्या ‘त्या’ ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने स्वत:वर झाडली गोळी; आधी पोलीस ठाण्यात शिरला, नंतर…
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Ratan Tata Brother at His Funeral
Ratan Tata : रतन टाटांना अखेरचा निरोप देताना भाऊ जिमी टाटांना अश्रू अनावर, सावलीसारखा भाऊ हरपल्याचं मनात दुःख
Crowd in NCPA for Ratan Tatas funeral
रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी ‘एनसीपीए’मध्ये गर्दी
Pune bopdev ghat ganga rape case police investigation
तपासाच्या व्याप्तीत वाढ, ‘बोपदेव घाट’ प्रकरणी सराइत लुटारूंची चौकशी; आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके
Woman killed due to family dispute in Pune news
कौटुंबिक वादातून महिलेचा खून; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार
Israel-made time machine Kanpur scamroject
Kanpur Age scam: ‘६० वर्षांच्या वृद्धाला २५ वर्षांचा तरुण बनवू’, कानपूरच्या दाम्पत्यानं इस्रायलच्या मशीनचा हवाला देऊन ३५ कोटी लुबाडले
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ प्रकृती बिघडल्याने बॉम्बे रुग्णालयात, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यातून करण्यात आलं एअरलिफ्ट

हे ही वाचा >> Raj Thackeray : “टोलच्या आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर…”, टोलमाफीनंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

तीन वर्षांपूर्वी मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती

मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू करण्यात आली. या दुखण्यातून सावरण्यासाठी त्यांना अनेक आठवडे लागले होते.

हे ही वाचा >> आधी महायुतीचा ‘चेहरा’ जाहीर करा! मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत उद्धव ठाकरे यांचे आव्हान

दसरा मेळाव्यातून महायुतीवर केलेला हल्लाबोल

दोन दिवसांपूर्वी दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली होती. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहे. आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन होत असतं. प्रत्येकाकडे वेगळी शस्त्रं असतात. कुणाकडे गन आहे, कुणाकडे अजून काय आहे. आमच्याकडे लढवय्या मन आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच त्यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख म्हणाले होते, आम्ही आज (१२ ऑक्टोबर) शस्त्रपूजा केली त्यात बाकी शस्त्र आहेतच, पण शिवसेना प्रमुखांच्या कुंचल्याची (व्यंगचित्र काढण्यासाठी वापरला जाणारा ब्रश) पूजाही आम्ही केली. आता तुम्हा सगळ्यांची पूजा करतो आहे. कारण तुम्ही सगळेजण शिवसेनेची शस्त्रं आहात. एकीकडे अब्दालीसारखी माणसं, यंत्रणा, केंद्रात सत्ता असं सगळं आहे. यांनी मनसुबा आखला आहे की उद्धव ठाकरेंची सेना संपवा. पण ही शिवसेना नाही ही वाघनखं आहेत जी माझ्यासमोर बसली आहेत.