गेल्या चार दिवसांपासून झालेली दगदग आणि मानसिक तणावामुळे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ‘मातोश्री’वर आलेल्या नगरसेवकांना उद्धव ठाकरे भेटू शकले नाहीत. अखेर रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी नगरसेवकांशी संवाद साधला आणि त्यांना प्रभागांमध्ये परतण्याचे आवाहन केले.
बुधवारी सायंकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ढासळल्यामुळे तमाम शिवसैनिकांनी वाद्रय़ातील कलानगरामधील ‘मातोश्री’ या निवासस्थानी धाव घेतली होती. मात्र नगरसेवकांना ‘मातोश्री’मध्ये सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे गेले तीन दिवस ते बाहेरच ठिय्या मांडून बसले होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एकदा तरी भेटावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. महापौर सुनील प्रभू यांनी नगरसेवकांचा निरोप उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता नगरसेवकांना भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी नगरसेवक ‘मातोश्री’वर दाखल झाले. मात्र गेल्या चार दिवसांपासून कमालीचा ताण पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांनी विश्रांती घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नगरसेवकांना भेटता आले नाही. ‘मातोश्री’वर जमलेल्या शिवसेना नगरसेवकांशी रश्मी ठाकरे आणि मनोहर जोशी यांनी संवाद साधला. शिवसेनाप्रमुखांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. त्यांना अपेक्षित असलेले काम प्रभागांमध्ये करावे. ‘मातोश्री’ बाहेर गर्दी करण्याऐवजी आपापल्या प्रभागात जावून नागरी समस्या सोडवाव्यात, असे रश्मी ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधताना सांगितले. त्यानंतर चहापान उरकून काही नगरसेवक ‘मातोश्री’वरुन आपापल्या प्रभागांमध्ये परतले. तर काही नगरसेवक-नगरसेविकांना तेथे थांबण्यास सांगण्यात आले होते.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : अमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्यास सदा सरवणकर ठाम; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Pimpri Vidhan Sabha, Sharad Pawar candidate,
पिंपरी विधानसभा : ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बंडाचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवार काय म्हणाल्या? वाचा..
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
Maharashtra elections
अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमदेवारी; माहीममध्ये होणार तिरंगी लढतं!
MNS president Raj Thackeray to inaugurate Raju Patils election central campaign office in Dombivli
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी डोंबिवलीत
Former Shiv Sena MLA Parshuram Uparkar joined Shiv Sena UBT today in Uddhav Thackerays presence
माजी आमदार परशुराम उपरकर ठाकरे शिवसेनेत स्वगृही परतले
uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी ?