राज ठाकरे यांच्या गाडीवर मंगळवारी संध्याकाळी नगरमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. विरोधकांच्या गाड्यांवर अशा पद्धतीने हल्ला करणे, योग्य नसल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांचे समर्थन करताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्ला चढविला. 
पोलिसांना बाजूला ठेवून मैदानात उतरा, मग शिवसैनिक पाहून घेतील, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. दरम्यान, कोल्हापूरमधील सभेत उद्धव ठाकरेंच्या ‘टाळी’ला राज ठाकरे यांनी टोला लगावला होता. कोणाबरोबर युती करण्याची इच्छा नसून, स्वबळावर लढण्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंची बाजू उचलून धरल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

Story img Loader