उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं. “आता सगळ्यांना पटायला लागलंय की, २०२४ ची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक असेल,” असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. ते सोमवारी (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणुक आयोग बोगस! त्याला चुना लावणारा आयोग म्हणायला हवे. सगळं भाजपाच्या सोयीने सुरु आहे. आता सगळ्यांना पटायला लागलंय की, २०२४ ची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक असेल. कपिल सिब्बल जे म्हणाले ते योग्य आहे. घटना स्पष्ट आणि स्वच्छ आहे. मध्येच निवडणुक आयोगाने चोमडेपणा करण्याची गरज नव्हती.”

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार

“चोरीचा मामला, जोरजोरात बोंबला”

“चोरीचा मामला, जोरजोरात बोंबला, अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. सर्वकाही चोराल, पण ठाकरे कसे चोराल? ठाकरे म्हणजे मी एकटा नाही. माझ्यासमोर असलेली जनता म्हणजे ठाकरे आहे. काहीही चोरता येतं, पण संस्कार चोरता येत नाहीत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

“त्यांना लाज-लज्जा नसेल, पण दिवार चित्रपटात जसा हातावर शिक्का होता, तसाच…”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आई वडील जे संस्कार देतात ते झाले नाहीत, की मग दुसऱ्यांची गोष्ट चोरण्याची वेळ येते. त्यामुळे मी चोरांवर जास्त बोलणार नाही. त्यांना लाज-लज्जा नसेल, पण दिवारमध्ये जसा हातावर शिक्का होता, तसाच हे जेव्हा छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा त्यांच्या कपाळावर शिक्का असेल की, तू स्वतः चोर आहेस. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे.”

हेही वाचा : युक्तिवादाच्या शेवटी ठाकरे गटाचे वकील भावनिक, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल काय म्हणाले? वाचा…

“…म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता”

“मी आणीबाणीचा काळही पाहिला आहे. त्यावेळी देशात बेधुंदी माजेल की काय अशी परिस्थिती होती. म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. मात्र, याचा अर्थ नंतर आणीबाणीत जे झालं त्याला शिवसेनाप्रमुखांचा पाठिंबा होता असं नाही. आणीबाणीत मार्मिकवरही बंधनं होती. मार्मिक छापण्यासाठी बंदी नाही, मात्र मार्मिकच्या छापखान्यावर बंदी अशी विचित्र बंदी असायची. इतर कोणी छापून द्यायला तयार व्हायचे नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

Story img Loader