मुंबई : लोकसभा निवडणुकीची तोंडावरच राज्यात पक्षांतराला वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ‘ईडी’ कारवाईपासून बचाव करण्यासाठी वायकर यांनी पक्षांतर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जोगेश्वरीत मुंबई महापालिकेच्या भूखंडावर पंचतारांकित हाॅटेल उभारण्यावरून ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर यांच्याविरोधात ईडीने कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी स्वत: वायकर व त्यांची पत्नी आरोपी असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविली जात होती. या कारवाईपासून सुटका करून घेण्यासाठीच वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आपल्या मतदारसंघातील आरे वसाहत तसेच जुन्या इमारतींचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा वायकर यांनी केला. ‘ईडी’ कारवाईबाबत विचारले असता यंत्रणांना आपण सहकार्यच केल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयात मुंबई महानगरपालिकेने आपली बाजूच उचलून धरल्यामुळे गैरव्यवहार झालेला नाही हेच स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. वायकर यांना अपेक्षित असलेली कामे मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र या पक्षप्रवेश सोहळ्यात वायकर यांची देहबोली वेगळेच सांगत होती. वायकर हे अत्यंत धीरगंभीर दिसत होते तर त्यांच्या पत्नीचा चेहराही उतरला होता, असे तेथे उपस्थित असलेल्यांचे म्हणणे होते. ठाकरे गटाच्या ४५ माजी नगरसेवकांनी आतापर्यंत आपल्या पक्षात प्रवेश केला असून काही जण वाटेवर असल्याचा दावा शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या वायकरांनी चार वेळा मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. फडणवीस सरकारमध्ये ते गृहनिर्माण राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री होते.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Only 30 percent of road works were completed during the Eknath Shinde government Mumbai news
‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण
cm Eknath Shindes promise to make Mumbais roads pothole free in two years vanished
मतदान यंत्रांमध्ये फेरफार नसल्याचे शपथ घेणाऱ्या विरोधकांना पटले का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल

काँग्रेसमध्ये संजय निरुपम नाराज

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे तेथून इच्छूक असलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम नाराज झाले आहेत. महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम झाले नसताना कीर्तीकर यांची उमेदवारी कशी जाहीर करण्यात आली, असा सवाल त्यांनी केला. अमोल कीर्तीकर हे करोना काळातील खिचडी घोटाळ्यातील आरोपी असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. निरुपम यांची समजूत घालण्यासाठी आघाडीत अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचा खुलासा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला. मात्र डावलले गेल्यास निरुपम वेगळा विचार करू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

‘ईडी’च्या भीतीने आणखी एक नेता शरण !

रविंद्र वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईच्या भीतीने सत्ताधाऱ्यांना शरण जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. सत्ताधारी पक्षात गेल्यास कारवाईपासून दिलासा मिळतो, हे यापूर्वी स्पष्ट झाल्याने अटकेपासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उलणाऱ्यांची मोठी संख्या आहे.

Story img Loader