मुंबई : भाजपच्या विरोधात देशात आणि राज्यातही विरोधकांची एकजूट कायम ठेवण्याची आवश्यकता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केली. ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. आणीबाणीनंतर जनता पक्षातील फाटाफुटीप्रमाणे परिस्थिती निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल, असे सांगतानाच पुन्हा भाजपसोबत जाण्याची शक्यता ठाकरे यांनी फेटाळून लावली.

‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या चौथ्या कार्यक्रमात ठाकरे यांनी देशातील व राज्यातील राजकीय परिस्थिती, विरोधकांची राजकीय वाटचाल, शिवसेना ठाकरे गटाची भविष्यातील वाटचाल, शिवसेनेतील बंड, अदानी समूहाचा कथित गैरव्यवहार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, भाजपबरोबर पुन्हा जाण्याची शक्यता आदी अनेक मुद्दय़ांवर मनमोकळेपणे भाष्य केले. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार हे ‘लोकसंवाद’ उपक्रमात सहभागी झाले होते.

What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
uddhav thackeray shiv sena leader ex mla rupesh mhatre join eknath shinde shiv sena
ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “रतन टाटांसारखा सभ्य व्यावसायिक सगळ्यांना आवडतो मग राजकारणी डँबिस…”

देशात आणि राज्यात कधी नव्हे इतके सुडाचे राजकारण सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार परस्परांवर टीका करायचे. पण त्यांच्यातील मैत्रीत कधी दुरावा आला नाही. आता मात्र विरोधकांबाबत कमालीचे सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांनी निष्पक्षपातीपणे काम करणे आवश्यक असते. सध्या या यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यानुसार काम करीत आहेत. विरोधकांनी मागणी केल्यास सत्ताधारी पक्षाचा असला तरी भ्रष्टाचाऱ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. विरोधकांना संपविण्याकरिताच या यंत्रणांचा वापर होत असल्याची टीकाही त्यांनी केली.  भाजपच्या विरोधात सारेच विरोधक एकटवत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पंतप्रधानपदाबाबत विरोधकांच्या बैठकीत निर्णय होईल. पंतप्रधानपदाचा चेहरा असला पाहिजे. पण तसा चेहरा नसला तरी जनता भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळली असल्याने विरोधकांचाच विजय होईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी अदानीवरून काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतल्याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले असता विरोधकांमध्ये मतभेद नसावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विरोधकांचे अनेक मुद्दय़ांवर मतभेद असल्याचे दिसत असले, तरी निवडणुकांच्या आधी किमान समान कार्यक्रम तयार करून वाटचाल केली जाईल. पण कुठेही ऐक्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. निवडणुकीला अद्याप कालावधी असल्याने विविध राजकीय पक्षांनी आताच आपली भूमिका मांडावी. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी परस्परांच्या विरोधात तलवारी म्यान कराव्यात, अशी भूमिकाही ठाकरे यांनी मांडली. शिवसेनेचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होईल, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. ते अजून अपूर्णच आहे. मला शरद पवार व अन्य नेत्यांच्या आग्रहामुळे अचानकपणे मुख्यमंत्री व्हावे लागले. मला ते कधीही नको होते. आता २०२४ मध्येही मला मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा नसून महाविकास आघाडीचे नेते योग्य वेळी उचित निर्णय घेतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पालिका प्रशासनावर ठपका

महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराची भारताचे महालेखापाल आणि महानियंत्रक (कॅग) यांनी चौकशी केली व निष्कर्ष काढले आहेत. पण अनियमितता किंवा अन्य बाबींना पालिकेतील सत्ताधारी राजकीय नेते नाही, तर प्रशासन व अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. स्थायी समितीत ठराव झाले, तरी अंमलबजावणीसाठी आयुक्तांकडे जातात. त्याची कार्यवाही किंवा आदेश काढण्याचे अधिकार हे त्यांनाच असतात याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. प्रशासकीय कार्यकाळातील कारभाराची चौकशी झाली पाहिजे. कारण रस्त्यांच्या कामांच्या निविदांमध्ये बरीच गडबड झाल्याच्या बाबी समोर येत आहेत. हे सारे या सरकारच्या काळात होत आहे, असेही ठाकरे म्हणाले.  

अदानींच्या चौकशीचा आग्रह कायम

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे हजारो कोटी रुपये कुठे गेले, याचा शोध घेण्यासाठी अदानी उद्योग समूहाची नि:पक्षपातीपणे चौकशी झालीच पाहिजे. ती संयुक्त संसदीय समितीकडून करायची की सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीकडून करायची याचा योग्य निर्णय व्हावा. पण अदानी घोटाळय़ावरून ज्यांना जाब विचारला जात आहे त्यांनी उत्तर देणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला.

फडणवीसांच्या अयोध्या वारीवर सवाल

अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा शिवसेनेने प्रथम उपस्थित केला. मी मुख्यमंत्री असतानाही आणि आधीही अयोध्येला गेले होतो. पण पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीस कधीही अयोध्येला गेले नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  दौऱ्यावर गेले असताना तेही अयोध्येत गेले. हे सारे श्रेयवादातून होत असावे, असा चिमटा ठाकरे यांनी काढला.

‘राज ठाकरे यांची भूमिका कोणती?’

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आधी मराठी मग हिंदूत्वाची भूमिका घेतली. सध्या त्यांची नेमकी भूमिका काय, असा सवाल ठाकरे यांनी केला. ‘ठाकरे बंधूंची बैठक झाली होती’ या राज यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात काही अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संघाला हे मान्य आहे का?’

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाईच्या नावाखाली भ्रष्ट लोकांना भाजपमध्ये घेऊन निर्दोषत्व बहाल केले जात आहे किंवा कारवाया थांबविल्या जात आहेत. देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण सुरू असून विरोधकांना अडकविण्यात येत आहे. देश ज्या मार्गाने चालला आहे, ती भाजपची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात संघाचे योगदान काय, यासह अन्य मुद्दय़ांवर मी वस्तुस्थितीच मांडली, त्यात चुकीचे काहीच नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

* देशाची वाटचाल संघराज्य पद्धतीकडून अध्यक्षीय पध्दतीकडे.

* अतिविश्वास टाकलेल्यांनी दगा दिला, कीड नको म्हणून त्यांना थांबविले नाही.

* स्वा. सावरकरांच्या मुद्दय़ावरील मतभेद मिटले आहेत. महापालिका निवडणुका घेण्याची हिंमत नाही.

* एकदा अमेरिका, ब्रिटनप्रमाणे मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्या. * पुस्तकांची पाने फाडून इतिहास बदलला जाणार नाही.