शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. तसेच नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूनंतर डीनला संडास साफ करायला लावल्याच्या घटनेवरून शिंदे गटाच्या खासदारावर शाब्दिक हल्ला चढवला. ते शुक्रवारी (६ ऑक्टोबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले. ते डीन आदिवासी आहेत असं ते म्हणतात. मी कधीच जातपात पाहिली नाही. मी सर्वांना एकाच न्यायाने वागवलं आहे. मात्र, डीनला संडास साफ करायला लावल्यानंतर त्या गद्दारावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून डीनला धमकावण्यासाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?”

discord in Mahayuti, Mahayuti, Mahayuti Kolhapur,
कोल्हापुरातील कार्यक्रमातून महायुतीतील विसंवादाचे दर्शन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमात सवतासुभा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
cost of inauguration ceremony of Metro should be taken from honorarium of cm and Deputy cm says MLA Ravindra Dhangekar
मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे : आमदार रवींद्र धंगेकर
Inauguration of sculpture of Mahatma Phule and Savitribai Phule in Nashik
नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
CM Siddaramaiah
CM Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या अडचणीत वाढ; MUDA जमीन गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
MP Rahul Shewale defamation case Uddhav Thackeray Sanjay Raut defamation case
खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीचे प्रकरण: उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर मानहानीचा खटला चालवणार
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

“मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांचा खर्च करणार का?”

“राज्यभर औषधांचा तुटवडा आहे. मंत्री म्हणतात औषधे मुबलक आहेत, पण प्रत्यक्षात खडखडाट आहे. या बातम्या माध्यमांनीच दिल्या आहेत. मग हे मंत्री नेमके कोण आहेत. आरोग्य खातं विभागलं गेलं आहे. मात्र, औषधं मुबलक प्रमाणात आहेत असा दावा करणारे मंत्री कोणीही असले, तरी चंद्रपूरची एक महिला सांगत आहे की, बाहेरून औषधं आणण्यासाठी आम्हाला लिहून दिलं जातं. मग पंतप्रधानांच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, मुख्यमंत्री सहायता निधी यातून या रुग्णांचा खर्च केला जाणार आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

“मुख्यमंत्री सहायता निधीची चौकशी झाली पाहिजे”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री सहायता निधीतील मदत नेमकी कुणाला जाते याची चौकशी झाली पाहिजे. ती बिलं खरी आहेत की नाही हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. मात्र, आज औषधं कुठेही नाहीत. करोना काळात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. आज दुसरी कोणतीही साथ नाही. आज केवळ भ्रष्टाचाराची साथ आहे. आरोग्य खात्यातील नेमणुकांसाठी रेट कार्ड ठरवल्याचं माझ्या कानावर येत आहे.”

हेही वाचा : अन्वयार्थ: मस्तवाल लोकप्रतिनिधी

“औषधं खरेदीतील दलालांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”

“निविदा प्रक्रिया बंद होणार असेल आणि विना निवादा औषध खरेदी करणार असतील, तर याचा अर्थ सरकार सरळसरळ भ्रष्टाचाराला दार उघडं करून देत आहे. आज जिकडे औषधं पोहचलेली नाहीत तिकडे कुणाचे दलाल बसले आहेत का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कारण युतीचं सरकार होतं तेव्हा धरण खेकड्यांमुळे फुटलं होतं. अशा धरण फोडणाऱ्या आणि आपल्या शेतात पाणी वळवणाऱ्या खेकड्यांच्या हातात कारभार गेला आहे का?”, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारत टोला लगावला.