Uddhav Thackeray on Narendra Modi : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे. या विजयासह गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं अभिनंदन केलं आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Gujarat Election Results 2022 Live: “महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही…”, उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदी आणि भाजपाला टोला; वाचा प्रत्येक अपडेट

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Jitendra Awhad
Jitendra Awhad : “ताजमधले केक अन् चांगली कॉफी…” विधानसभेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करताना आव्हाडांची खास मागणी चर्चेत
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

गुजरातमध्ये भाजपाने मिळवलेला विजय विक्रमी आणि ऐतिहासिक असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. “गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती. त्यामुळे जनतेनं भाजपाला भरघोस मतदान केलं ”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Himachal Pradesh Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस विजयाच्या जवळ, आतापर्यंत २९ जागांवर विजय

पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांवरून मोदींना टोलाही लगावला. “गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा” असे ते म्हणाले. “आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे. ज्यांचं त्यांचं राजकारण सोयीनुसार चालत असतं”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Story img Loader