केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेवर कोणाचा दावा यावर निर्णय देताना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. “भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं वाटत असेल की त्यांच्या गुलाम बनलेल्या सरकारी यंत्रणा आमच्या अंगावर सोडून आम्हाला संपवता येईल, तर शिवसेना संपवणं शक्य नाही,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. ते शनिवारी (१८ फेब्रुवारी) मुंबईत मातोश्रीसमोर जमा झालेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यांनी धनुष्यबाण चोरला आहे त्यांनी मधमाशांच्या पोळावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेल्या मधाचा स्वाद घेतला आहे. अद्याप त्यांना मधमाशांचे डंख लागले नाहीत. आता हे डंख मारण्याची वेळ आली आहे.”

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”

“मागील ७५ वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या पक्षावर असा आघात”

“असा आघात मागील ७५ वर्षांत कोणत्याही पक्षावर झाला नसेल. भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं वाटत असेल की त्यांच्या गुलाम बनलेल्या सरकारी यंत्रणा आमच्या अंगावर सोडून आम्हाला संपवता येईल, तर शिवसेना संपवणं शक्य नाही. त्यांच्या पुढील अनेक पीढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

“निवडणूक आयोगाने काल गुलामी केली, या गुलामांनी मी आव्हान देतो की…”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “निवडणूक आयोगाने काल गुलामी केली. निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यावर एखाद्या राज्याचे राज्यपाल होऊ शकतात. कारण आत्ताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झाले आहेत. असे गुलाम त्यांनी अवतीभोवती ठेवले आहेत. मी या गुलामांना आव्हान देतो की, शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राच्या मालकांनी ठरवण्याची वेळ आली आहे.”

“मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागत आहे, मात्र…”

“धनुष्यबाण कोणाचा हे जनतेला ठरवू द्या. शिवसेना कोणाची हे कोणालाही विचारा. यांचा एक डाव सुरू आहे. त्यांना ठाकरे नाव हवं आहे, बाळासाहेबांचा चेहरा हवा आहे. मात्र, शिवसेनेचं कुटुंब नको आहे. आमच्यावर मोदींचं नाव सांगून आरोप करत होते. तेव्हा आमची युती होती. तेव्हा लोक मोदींचा मुखवटा घालून सभेला यायचे, आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागत आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही. मुखवटा कोणता आणि खरा चेहरा कोणता हे जनतेला माहिती आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केलं.

हेही वाचा : “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

“हे आपलं मशाल हे निशाणही काढून घेऊ शकतात”

“शिवसेना हे नाव चोरांना देण्यात आलं. आपला पवित्र धनुष्यबाण चोरांना देण्यात आला. ज्या कपट कारस्थानाने हे राजकारण करत आहेत त्यावरून हे आपलं मशाल हे निशाणही काढून घेऊ शकतात. मात्र, माझं आवाहन आहे की, ज्यांनी धनुष्यबाण चोरले ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत या, मी मशाल घेऊन तुमच्यासमोर येतो. पाहू कोण जिंकतं ते. कारण धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

Story img Loader