बुधवारी रात्री मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीतून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच भाजपावरही जोरदार टीकास्र सोडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो”; NCPच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देताच उद्धव ठाकरे म्हणाले, “आधी गावपातळीवर…”

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पाला ‘पंचांमृत’ असं गोड नाव दिलं आहे. आता ‘पंचांमृत’ म्हटल्यानंतर कोणी लस्सी सारखं पीत नाही. पंचामृत हातावर पळीने थोडं थोडं दिलं जातं. त्याने कोणाचंही पोट भरत नाही. ते हातावर जेवढं पडेल तेवढं प्यायचं आणि बाकीचं डोक्यावरून फिरवायचं. असा विचित्र अर्थसंकल्प या सरकारने जाहीर केला आहे. या ‘पंचांमृता’तील काही थेंब या सरकारी कर्मचाऱ्यावर उडवायला काहीही हरकत नव्हती”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – चाळीस आमदारांचेच लाड का?, एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याने भाजप आमदार आक्रमक 

भाजपालाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी भाजपावरही टीकास्र सोडलं. “शिवाजी महाराजांच्या काळात जशी आपल्या सैनिकांना आणि मंत्र्यांना अफझल खानाने फर्मान पाठवले होते. गपगुमान आमच्या सैन्यात दाखल व्हा नाही, नाही तर कुटुंबासटक मारले जाल. त्यावेळी काही जण गेलेही. आता तोच काळ परत आला आहे. आता एकतर भाजपाच सामील व्हा नाही तर तुरुंगात जा, अशी परिस्थिती आहे. पुढे महाराजांनी अफझल खानाचं काय केलं हे वेगळं सांगायची गरज नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – महाविकास आघाडीकडून राज्यभर सभा, उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

“गावपातळीवर एकत्र येऊन लढा”

दरम्यान, यावेळी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर “देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो” अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर उद्धव ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यास काहीही हरकत नाही. पण आधी सगळ्यांनी एकत्र येऊन लढा. आधी गावपातळीवर एकत्र येऊन दाखवा, असं ते म्हणाले.