Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live at Shivaji Park, Shinde vs Thackeray : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून तुफान राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. अखेर मुंबईच्या शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला.
या पार्श्वभूमीवर या सभेतील नेतेमंडळींच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं.
अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान आरोप-प्रत्यारोप आणि टोलेबाजी या भाषणांमध्ये पाहायला मिळाली.
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live News : उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, कुणाला लक्ष्य करणार?
आनंद दिघेंना जाऊन २० वर्ष होऊन गेली. आजपर्यंत आनंद दिघे आठवले नाहीत. पण आज आठवतायत, कारण आनंद दिघे आता काही बोलू शकणार नाहीत. आनंद दिघे जातानाही भगव्यात गेले. ते एकनिष्ठ होते. त्यांनी भगवा सोडला नाही.
माणसाची हाव किती असते? इतरांना बाजूला सारून तुला आमदार केलं मंत्री केलं, आता मुख्यमंत्री झाला. पण तरी शिवसेनाप्रमुख व्हायचंय यांना. शिवसेनाप्रमुख म्हणून त्याला स्वीकारणार का तुम्ही? आहे का लायकी त्याची? एकतर स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा. त्यांना वाटेल काय हे दिवटं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या बापाचं नाव लावतंय.
आज तुम्ही जे केलं, हेच मी तुम्हाला म्हणत होतो. तेव्हा सांगितलं की संभवही नही. मग आत्ता तुम्ही जे केलं, ते तेव्हाच का नाही केलंत? पण शिवसेना संपवायची म्हणून हे सगळं.
मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा सात जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता. तेव्हा माहीत नव्हतं की बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आहे? की बोलताना स्वत:ची दाढी स्वत:च्याच तोंडात जात होती? घेतली होती ना इथेच शपथ? अमित शाह जे बोलले की आमचं असं काही ठरलंच नव्हतं. मी आज शिवरायांच्या साक्षीनं माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की जे मी बोलले, ते तसंच ठरलं होतं. भाजपा आणि शिवसेनेचं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं – उद्धव ठाकरे</p>
काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय. मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपानं पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. – उद्धव ठाकरे
ज्यांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या.. ते नाराज होऊन गेले. पण ज्यांना मी काही देऊ शकलो नाही, ते तुम्ही सर्व आजही माझ्यासोबत निष्ठेने आहात हे माझं नशीब आहे. ही शिवसेना एकट्या-दुकट्याची नाही. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. तुम्ही ठरवणार आहात की मी पक्षप्रमुख राहायचं की नाही. एकाही एकनिष्ठानं सांगावं की निघून जा, मी आत्ता निघून जाईन. पण तुमच्यापैकी एकानं सांगायला हवं. गद्दारांनी सांगायचं.
यानंतर रावणदहन होणार आहे. पण यावेळचा रावण वेगळा आहे. आत्तापर्यंत रावण १० तोंडांचा होता. आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावणही बदलतो. वाईट आणि संतापही एका गोष्टीचा वाटतो, की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो.
त्यांना गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती. आज हे शिवतीर्थ बघितल्यावर त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न पडला की अरे बापरे, गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही. – उद्धव ठाकरे
ही गर्दी विकत मिळत नाही. हे ओरबाडून घेता येत नाही. ही कोरडी गर्दी नाही. अंत:करण ओलं असलेल्या माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे. याच मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी तुम्हाला नतमस्तक झालो होतो. कोणत्याही अनुभवाशिवाय तुमच्या प्रेमाच्या जोरावर कारभार केला. अजूनही डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाही. पण तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही – उद्धव ठाकरे
गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि ते दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत. पण असा मेळावा फार क्वचित झाला आहे. अभूतपूर्व आहे हे. मी भारावून गेलो आहे – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात!
शिवसेना सोडून १८ वर्ष झाली. पण सारखं मी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना सोडली म्हणे. अरे मेलास तू, तुला उद्धव ठाकरेंनी दोन वेळा पाडला. तुझ्या मुलाला दोन वेळा पाडला. तू पक्ष काढलास, त्या पक्षात तुझा मुलगाही आला नाही. मला फडणवीसांना एकच विचारायचं आहे. तुम्ही यांच्या तोंडून आज घाण बोलून घेत आहात. पण विधानपरिषदेच्या सभागृहात याच कोंबडीचोरानं म्हटलं होतं की भाजपा म्हणजे लुटारूंचा, दारुवाल्यांचा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. आज तुमच्याकडे तो आल्यानंतर तो सज्जन झाला – भास्कर जाधव
खरंतर आज त्या कोंबडीवाल्याचा समाचार घ्यायचा होता. शिवसेना सोडल्यानंतर त्याची पुढची टोक तुटली आहे. पण कोंबडीला दोन तोंडं असतात. एक पुढचं टोक आणि एक मागचं तोंड. सारखं काहीतरी चालू असतं. हा अकलेचा कांदा, कोंबडीवाल.. याची कुंडली माझ्याकडे, त्याची कुंडली माझ्याकडे. तिकडे प्राप्तीकर विभागात शिपाई होतास. शिवसेनाप्रमुखांनी एवढं मोठ केलं, तरी शिपाई तो शिपाईच राहिला. मला तोंड उघडायला लावू नका म्हणे. खरंच तोंड उघडलं तर एवढं घाणेरडं आहे की याच्या तोंडून कधी चांगलं काही निघतच नाही – भास्कर जाधव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कवरील व्यासपीठावर आगमन.. येताच गुडघ्यावर बसून व्यासपीठाला केला नमस्कार!
देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणालात कायद्याच्या चौकटीत बोला. पण तुम्ही त्याची काळजी करू नये. तुम्ही कायदा मोडायलाच बसला आहात. कायदा मला चांगला कळतो. कारण कायदा माझ्या बापानं लिहिला आहे. – सुषमा अंधारे
दीपक केसरकर, आपण फारच संयमानं बोलता. मुंबई ते गोवा जी टूर तुम्ही केली, तिचा सर्व हिशोब तुम्ही देणार होतात. त्याचा हिशोब तुम्ही अजून दिलेला नाही. संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात मेहंदीवाल्याची, ब्युटी पार्लरवाल्याचीही चौकशी केली होती. आता बीकेसीच्या मैदानासाठी १० कोटी रुपये कुणाच्या खात्यातून खर्च केले? किरीट सोमय्या, १० कोटींची चौकशी कधी करणार ते आधी बघा – सुषमा अंधारे
तुम्ही आनंद दिघेंचे वारसदार आहात? मग आनंद दिघेंनी राम कापसेला पराभूत करून काय पद्धतीने ठाण्याची जागा निवडून आणली होती हे विसरलात काय तुम्ही? तुमचं हिंदुत्व फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालेलं हिंदुत्व आहे. तुम्ही वाट पाहात आहेत की सुषमा अंधारे किंवा आम्ही बोलणारे कशात सापडू. पण काळजी करू नका. तुम्ही एका संजय राऊतांवर कारवाई करू शकलात. पण शिवसेना विचार आहे. शिवसेना संपणारी नाही. शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रुजली आहेत. पावसाली भूछत्रासारख्या उगवलेल्या माणसांनी शिवसेना संपेल, अशी वल्गना करू नये – सुषमा अंधारे
तुम्हाला एक आव्हान आहे. तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असाल, तर कल्याणमधली श्रीकांत शिंदेंची जागा भाजपाला देऊन टाका. मुंबईतली प्रताप सरनाईकांची जागा भाजपाला देऊन टाका. शिरुरमधली आढळराव पाटलांची जागा भाजपाला देऊन टाका. त्याग काय ते तरी कळेल – सुषमा अंधारे
हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला. कारण हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना पळून जात नाही, एकमेकांना आधार देतो – सुषमा अंधारे
रामदास कदम, शिवसेनेला ब्लॅकमिल करून राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिलीत, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? आम्ही काय बगलेत रेडिओ ठेवतो, धोतरावर इन करतो, कानात बिडी आहे का आमच्या? काय नाटक चाललंय हे? उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय इतर धर्माचा स्वीकार केला का? त्यांनी नुपूर शर्मासारखी थिल्लर वक्तव्य केली नाही, ही त्यांची चूक आहे का? – सुषमा अंधारे
नारायणराव, तुम्ही शहाणेसुरते आहात. पण तुम्ही बोलावं हिंदुत्वावर? विसरलात का नारायणराव, त्याच सोनिया गांधींच्या पायावर लोटांगण घालत गेली १० वर्ष आमदारकी, खासदारकी, महसूलमंत्रीपद भोगली.. त्या तुम्ही शेंड्यावर शहाणं होऊन आम्हाला हिंदुत्वावर सांगायचं का? – सुषमा अंधारे
ते म्हणाले आम्हाला हिंदुत्व जपायचं होतं. सगळी चिल्लर कंपनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन निपटेन मी. पण दोन लोकांवर बोललं पाहिजे. किरण पावसकरांनी म्हणावं की आम्ही हिंदुत्वासाठी जातोय? तुम्ही शिवसेनेत होता..अजित पवारांनी चॉकलेट दिल्यावर राष्ट्रवादीत गेलात. मग मिंधे गटात गेलात. किरण पावसकर, तुमचं हिंदुत्व ६ वर्ष कुठे टांगून ठेवलं होतं? – सुषमा अंधारे
आईला आणि बापाला विसरणाऱ्या औलादी इथे जन्माला आल्या आहेत. मी बोलण्याआधीच विरोधकांना पोटशूळ उठलाय. म्हणे हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेत सुषमा अंधारे कशा? तुमचंच चित आणि तुमचंच पट का? बीकेसीमधला इव्हेंट करणारे तुम्ही हिंदुत्व जपणारे का? ज्याला नांदायचंच नसतं, त्याला १२ मुद्दे सुचतात.- सुषमा अंधारे
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा भगवा मुंबई पालिकेवर फडकवायलाच हवा. तरच ही मुंबई महाराष्ट्रात ठेवता येईल. मुंबई महाराष्ट्रात हवी असं वाटणाऱ्या प्रत्येक मराठी माणसानं उद्धव ठाकरेंसोबत राहायला हवं. – सुभाष देसाई
समोरचे लोक म्हणतात माझ्याकडे ५० खोके, ५० आमदार, गुवाहाटी, सूरत आहे. पण मी सांगेन, माझ्याकडे उद्धव ठाकरे आहेत. यांच्या बळावर तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही – अंबादास दानवे</p>
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रडवणारं सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आमदारांच्या अंगात सत्तेची मस्ती चढली आहे. मुंबईचा बोरीवलीतील सुर्वे नावाचा आमदार सांगतो की मी तुला जामीन देतो, कुणाचेही हातपाय तोड. संतोष बांगरनं मध्यान्न भोजन अधिकाऱ्याला मारहाण केली. कुणावरही कारवाई झाली नाही. – अंबादास दानवे
गेल्या ७०-८० दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात पावणेचारशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या – अंबादास दानवेंचा गंभीर दावा
मी संभाजीनगरात सांगितलं होतं की भाड्यानं एकही गाडी लावणार नाही आणि भाड्याचा एकही माणूस आणणार नाही. बाकी ठिकाणी ५ हजार बस लावण्यात आल्या. इथे माजी परिवहनमंत्री आहेत, त्यांना राज्यात किती बसेस हे चांगलं माहिती आहे. – अंबादास दानवे
शिवसेना सर्वसामान्यांची आहे याचं मी एक उदाहरण आहे. मी गेल्या दोन महिन्यांत राज्यातल्या १८ जिल्ह्यांत फिरून आलो. रोज अनेक वल्गना केल्या जातात. पण जनतेप्रती सरकारची संवेदनशीलता हरवली आहे. – अंबादास दानवे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी ट्वीटच्या माध्यमातून शिंदे गटावर आगपाखड केली आहे.
आपल्या घरची भाकरी बांधून शिवतीर्थावर शिवसैनिकांच्या फौजा दाखल व्हायला लागल्या आहेत. अर्धी भाकरी खाऊ पण पक्षासाठी काहीही करू सांगणारा सैनिक आज आपल्या भावना व्यक्त करताना दिसतोय. हेच शिवसेनेचे वैभव आहे, हीच ताकद आहे!
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 5, 2022
(१/२)
Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live News : शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मोठी गर्दी!