Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live at Shivaji Park, Shinde vs Thackeray : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून तुफान राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. अखेर मुंबईच्या शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या पार्श्वभूमीवर या सभेतील नेतेमंडळींच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं.

अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान आरोप-प्रत्यारोप आणि टोलेबाजी या भाषणांमध्ये पाहायला मिळाली.

Live Updates

Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live News : उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, कुणाला लक्ष्य करणार?

18:40 (IST) 5 Oct 2022
तुमच्या माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही – किशोरी पेडणेकर

नेहमी वाटतं की तुम्ही गेलात तर ठीक आहे, पण स्वत:चं घर जाळण्याचं पाप करु नका. हा इतिहास तुम्ही कधी बदलू शकणार नाही आणि शिवसैनिक तुम्हाला तसं करू देणार नाही. तुमच्या माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का आता कधीही पुसला जाणार नाही. कुणी सांगतं की तुम्ही भाषणं नीट करा. आम्ही नक्की नीट करू. पण तुमचे मंत्री, आमदार कुणी कुणाचे डोळे काढतंय, कोण तंगडं तोडतंय.. एक आरोग्यमंत्री म्हणतात, मी कसला भिकारी होणार? मी महाराष्ट्राला भिकारी करेन. या आरोग्यमंत्र्यांचं नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवावं लागेल. ते काम मतदारांना करावं लागेल – किशोरी पेडणेकर

18:38 (IST) 5 Oct 2022

उद्धव ठाकरे म्हणतात मी जे बोलतो, ते करून दाखवतो. हीच त्या सगळ्यांना पोटदुखी आहे – किशोरी पेडणेकर

18:38 (IST) 5 Oct 2022

दरवेळी बघते.. १०-१५ वर्षांनी प्रत्येकाला उर्मी येते, मोड येतो.. आणि ते शिवसेनेवर थुकत निघून जातात. पण थोड्याच दिवसांत त्यांची तोंडं आवळण्याचं काम निष्ठावंत शिवसैनिक करतात. म्हणून आजही सर्वांना वाटत होतं की बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. पण कृतीने आपण तोंडं बंद करू शकतो – किशोरी पेडणेकर

18:37 (IST) 5 Oct 2022
महाराष्ट्रात ऑक्सिजनमुळे एकही रुग्ण दगावला नाही – किशोरी पेडणेकर

कोविड काळात सर्व राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा पडला. पण महाराष्ट्रात ऑक्सिजनमुळे एखादा रुग्ण मरण पावला असं कुठेही घडलं नाही. पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. – किशोरी पेडणेकर

18:36 (IST) 5 Oct 2022
आलेली माणसं आणि जबरदस्तीने आणलेली माणसं यात फरक असतो – किशोरी पेडणेकर

शिवसेना आणि दसरा मेळावा (संग्रहित फोटो)

Uddhav Thackeray Dasara Melava 2022 Live News : शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मोठी गर्दी!