मुंबई: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसचा दावा असलेल्या दुसऱ्या मतदारसंघात ठाकरे यांनी परस्पर उमेदवाराच्या नावांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दुरावा येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भास्कर जाधव अजित पवार गटात जाणार? धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “एक चांगली व्यक्ती आमच्याकडे…”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील राजकारण सध्या तापले आहे. भाजपच्या संजय पाटील यांनी मागील लोकसभा निवडणुकीत एक लाख ६४ हजार मतधिक्याने बाजी मारली होती. त्यांचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. दोन वेळा महाराष्ट्र केसरी राहिलेले कुस्तीगीर चंद्रहार पाटील यांनी सोमवारी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. ‘त्यांची उमेदवारी लोकांनी जाहीर केली आहे. त्यामुळे पाटील यांना आपल्याला दिल्लीत पाठवायचे आहे,’ असे सांगून ठाकरे यांनी पाटील उमेदवारी जाहीर केलीे. राज्यातील गद्दारांना आडवे करायला हवे, त्याचप्रमाणे देशातील हुकुमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. ठाकरे गट या हुकुमशाहीच्या विरोधात लढत राहणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने वाद निर्मण झाला आहे. जागावाटप अंतिम झालेो नाही, असा युक्तिवाद मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षां गायकवाड यांना स्पष्ट करावे लागले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray declare maharashtra kesari chandrahar patil candidate from sangli lok sabha constituency zws
Show comments