सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सोमवारी (३१ ऑक्टोबर) महत्त्वाचा आदेश दिला. यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर ३१ डिसेंबरआधी निर्णय घेण्यास सांगितले. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात उद्धव ठाकरेंनी देशातील लोकशाही धोक्यात आल्याचं म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्याायलयाने जे आदेश दिले आहेत त्यावर बोलणं भाग आहे. अपात्रतेचा निर्णय तर आहेत, पण आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व काय आहे, काय असणार आहे त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांती घटना व देशातील लोकशाही टीकणार की नाही हे ठरणार आहे. याकडे देशातील नागरिकांचं नाही, तर जगाचं लक्ष आहे.”

“लवाद सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानणार आहे की नाही?”

“आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही आहे आणि तीच लोकशाही धोक्यात आली असेल, तर आपण सर्वजण आणि सर्वोच्च न्यायालय काय करतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. लवाद सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानणार आहे की नाही? हे लवाद सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न जुमानता आपल्या मर्जीने, आपल्या मस्तीने वागायला लागले तर आपल्या देशाचे होणारे हाल कुणालाही सावरता येणार नाही,” असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

“सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात लवादाला म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आदेश दिले आहेत,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

हेही वाचा : सेना आमदार अपात्रता याचिकांवर ३१ डिसेंबपर्यंत निर्णय घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचा  राहुल नार्वेकरांना आदेश

“नार्वेकर मुद्दाम आदेशाची प्रत द्या आणि त्याच्यासमोर वाचन करा”

उद्धव ठाकरे म्हणाले, “मला समजलं की, काल राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर म्हणाले की, त्यांनी अद्याप तो आदेश वाचलेला नाही, त्यांनी केवळ ऐकलं आहे. त्यामुळे केवळ राहुल नार्वेकरांनाच नाही, तर राज्यातील सर्व जनतेला सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिले आहेत हे कळावेत. त्यासाठी सर्व आमदारांनी नार्वेकर मुंबईत असतील तर त्यांना या आदेशाची प्रत मुद्दाम द्या आणि त्याच्यासमोर त्याचं वाचन करा.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray first reaction on supreme court order over maharashtra political crisis pbs
Show comments