केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना या पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. या निर्णयानंतर शिंदेंच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी रविवारी सकाळी चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार निदर्शने सुरू आहेत. शिवसेनच्या कार्यकर्त्याची मोठी गर्दी याठिकाणी झाली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी याठिकाणी मोठा बंदोबस्त लावला आहे.
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात चेंबूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने
चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार निदर्शने सुरू आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 19-02-2023 at 12:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group activists protests against election commission s decision mumbai print news zws