अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी मोठा विजय मिळवला. भारतीय जनता पार्टीने माघार घेतल्यानंतर एकतर्फी झालेल्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांना ६६,५३० मते मिळाली. लटकेंविरोधात उभ्या असलेल्या अन्य सहा अपक्षांना दीड हजारांच्या आतच मते पडली. ‘नोटा’चा पर्याय १२,८०६ मतदारांनी स्वीकारल्याचं दिसून आलं. या विजयानंतर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’मधून भाजपा आणि शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. नोटाच्या मुद्द्यांबरोबरच हा निकाल म्हणजे भविष्यातील महानगरपालिका निवडणुकांची नांदी असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. इतकच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या एका विधानावरुनही ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की वाचा >> Andheri Bypoll: “‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले, माघारीनंतरही अंगातले किडे…”; ठाकरेंचा भाजपा-शिंदेंवर हल्लाबोल

What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “रतन टाटांसारखा सभ्य व्यावसायिक सगळ्यांना आवडतो मग राजकारणी डँबिस…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा घणाघात, “छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या…”
Raj Thackeray
Raj Thackeray : “सत्ता हातात द्या पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो”, राज ठाकरेंचं वरळीतील सभेत विधान
Uddhav Thackeray On Amit Thackeray
Uddhav Thackeray : अमित ठाकरेंच्या विरोधात माहिममध्ये सभा घेणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, “मला आवश्यकता…”

नोटा मतदान चर्चेत
पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये कमालाची निरुत्साह होता. भाजपच्या माघारीनंतर चित्रच पालटले होते. शिवसेना वगळता सहा जण रिंगणात होते. पण, त्यातील कोणीच फारसे प्रभावशाली नव्हते. ‘नोटा’चा वापर करावा, असे आवाहन केले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे अनिल परब यांनी भाजपवर केला होता. लटके यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची १२,८०६ मते ‘नोटा’ला मिळाली आहेत. लातूर ग्रामीणनंतर राज्यात अंधेरी पूर्वमध्ये ‘नोटा’चे बटण जास्त मतदारांनी पसंत केल्याचं दिसून आलं.

नोटासंदर्भात ठाकरे काय म्हणाले?
“भाजपा आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही. ‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही ‘नोटा’चा प्रचार केला गेला. लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली. त्यामुळे खोके सरकार आपल्या नामकरणास पुरेपूर जागले,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि भाजपावर केली आहे.

भाजपा किंवा लाचार मिंधे गटाचा उमेदवार असता तर…
“निवडणूक ग्रामपंचायतीची असो नाही तर विधानसभेची, खोक्यांशी नाते कायम ठेवायचे असे या मंडळींनी ठरवले आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतही तेच झाले. येथे ‘नोटा’साठी नोटा वापरल्या गेल्या. एकूण मतदानापैकी १२ हजार ८०६ मते ‘नोटा’ या पर्यायाला मिळाली. अर्थात, एवढे सगळे उपद्व्याप करूनही जनता ना ‘नोटां’ना भुलली ना ‘नोटा’च्या भुलभुलैयाला! ‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजपा व मिंधे गटाची मळमळ होती. मतदारांनी मात्र ऋतुजा लटके यांच्या पारड्यात भरभरून मतदान केले आणि भाजपा-मिंध्यांचे कारस्थान उधळून लावले. या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होता. पण भाजपा किंवा लाचार मिंधे गटाचा उमेदवार असता तर जनता अधिक जोमाने व त्वेषाने मतदान केंद्रावर पोहोचली असती. मतदानाचा आकडा ६० टक्क्यांवर गेला असता व मिंध्यांच्या बुडास मशालीचे चटके बसले असते,” असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

फडणवीसांचा संदर्भ देत कंस मामांचा उल्लेख
उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे त्याची ही नांदी असल्याचंही ठाकरेंनी म्हटलं आहे. “मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक’ असे गमतीचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले. पेच व कारस्थाने करणाऱ्यांना सोयीनुसार ईश्वर आठवतो हेच खरे! पण ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही.शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल तेच सांगतोय,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली
“धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर शिवसेना खचेल, हतबल होईल असे ज्यांना वाटत होते त्यांचे डोळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील ‘मशाली’च्या विजयी भडक्याने दिपले आहेत. ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे,” असा उल्लेखही लेखात आहे.