रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करू, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे कळते. अर्थात भाजपच्या कोटय़ातून त्यांना खासदारकी मिळावी, असाच त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत तीन जागा आणि राज्यसभेची एक जागा मिळावी, अशी आरपीआयची जुनीच मागणी आहे. गेल्या आठवडय़ात महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली. त्या बैठकीत आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी आणि त्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुखांनी लवकर करावा, अशी मागणी केली होती.
या बैठकीनंतर रामदास आठवले यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रविवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी  आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करू, असे आश्वासन उद्धव यांनी दिल्याचे समजते.  

Story img Loader