भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज(मंगळवार) भाजपाच्या जागर मुंबईचा या कार्यक्रमात बोलताना टीका केला. उद्धव ठाकरे हे हिंदूमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या त्यांना आरोप केली.
जाहीर सभेतील भाषणात बोलताना आशिष शेलार म्हणाले, “जे औरंगजेबालाही जमलं नाही ते आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना करू पाहत आहे, माझा थेट आरोप आहे. हिंदूंमध्ये विभाजन करण्याचं काम मोहम्मद गझनीच्या बापालाही जमलं नाही. आता तुमची राक्षसी इच्छा जागृत झाली की मराठी आणि मुस्लीम दोघांनाही मी फसवीण आणि मुंबईवर माझं हिरवं कवच पसरवीण, परंतु भाजपा आणि मुंबईकर हे कदापि होऊ देणार नाही.”
हेही वाचा -“आमच्या मदतीवरच उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते, अन्यथा…”; आशिष शेलारांनी लगावला टोला!
याशिवाय भाजपच्या माघारीनंतर एकतर्फी झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. त्यांना सर्वाधिक ६६ हजार ५३० मते मिळाली. मात्र दुसऱ्या क्रमांकाची मते नोटा या पर्यायाला मिळाल्याचे दिसून आले. तब्बल १२ हजार ८०६ मतदारांनी नोटाचे बटण दाबले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यावरून विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण, नोटाचा पर्याय स्वीकारावा म्हणून मतदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला होता. दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेहा वाचा – ‘अंधेरीत जे झाले ते बरे झाले, भाजपासाठी मुंबई महापालिका… ’; आशिष शेलारांचं विधान!
आशिष शेलार म्हणाले, ‘अंधेरीत जे झाले ते बरे झाले, भाजपासाठी मुंबई महापालिका विजयाचे चित्र स्पष्ट झाले. २०१४ नुसार विचार केला तर आघाडीच्या उमेदवारांना ९० हजार मते मिळायला हवी होती तसे घडले नाही. एक पक्ष दुसऱ्या पक्षाला मतदान करीत नाही. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईकरांचा मतदान करायलाही विरोध आणि मतपेटीतूनही प्रचंड विरोध आणि रोष समोर आला आहे. ’