आज रामनवमीच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्साहात रामनवमी साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानीही रामनवमीनिमित्त कार्यकर्ते जमले होते. निमित्त होतं थेट रामटेकहून मुंबईपर्यंत पायी चालत आलेल्या काही शिवसेना कार्यकर्त्यांच्या कौतुकाचं. यावेळी उद्धव ठाकरेंनी या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपाला टोला लगावला.

“ज्या हिंमतीनं रामटेक ते इथपर्यंत पायी येणं ही हिंमत आहे. ही जिद्द तुम्ही जिथून आला असाल तिथपर्यंत पोहोचवा. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे. धनुष्यबाण जरी कागदावरचा नेला असला, तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत. हे फक्त बाण नाहीत, तर हे ब्रह्मास्त्र आहेत. हे सगळे ब्रह्मास्र माझ्याबरोबर आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
Sanjay Raut on Raj Thackeray
Sanjay Raut on Raj Thackeray: “राज ठाकरे भाजपाच्या हातातलं…”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांची टीका
raj thackeray cm devendra fadnavis
Raj Thackeray: …म्हणून राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी झाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “आमच्याकडे त्यांना…”!
cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
uddhav devendra Fadnavis
“तू राहशील किंवा मी राहीन”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर फडणवीसांचं संयमी उत्तर ऐकून शिवसेनेची सारवासारव
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”

“धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभू राम माझ्याबरोबर”

“एका दृष्टीने पाहिलं, तर असं कुणीतरी कुणासाठीतरी इतके किलोमीटर पायपीट करत येणं आत्ताच्या काळात अवघड नाही, अशक्य आहे. तुम्हाला मातोश्रीत यावं आणि माझ्यासोबत उभं राहावं असं वाटणं हा मी रामाचा आशीर्वाद मानतो. रामटेकमधून निघून तुम्ही बरोबर राम नवमीला इथे पोहोचलात. काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभूराम माझ्यासोबत आहेत”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“आपण एकत्र आलो, तर लंकादहन शक्य आहे”

“लोकशाही वाचवणं हे केवळ माझ्या एकट्याचं काम नाही किंवा माझ्या एकट्यासाठी नाही. आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे. रामसेतू बांधताना वानरसेना तर होतीच, पण खारही होती. तेव्हा तर खारीनंही तिचा वाटा उचलला. आपण सगळे एकत्र आलो, तर लंकादहन करू शकणार नाही का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.

छत्रपती संभाजीनगर राडा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले..

“तेव्हा प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन दगड टाकला, तरी तो तरंगायचा. आत्ता राजकारणात तेच झालंय. प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगतायत. तेव्हा दगडांवर पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते तरंगत होते. आता दगडच तरंगतायत आणि दगडच राज्य करतायत. मग खऱ्या रामभक्तांनी करायचं काय? ते रामभक्तांचं काम मला तुमच्याकडून अपेक्षित आहे”, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

Story img Loader