Uddhav Thackeray शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा अंधेरी या ठिकाणी पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात अमित शाह यांचा समाचार घेतला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे यांची अवस्था रुसू बाई रुसू अशी झाली आहे असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोले लगावले. तसंच गद्दारांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना मान दिला जात होता. आता विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना सांगण्यात आलं आहे बसायचं तर बसा नाहीतर गावी निघून जा. ते एक गाणं होतं ना, रुसू बाई रुसू गावात बसू का कोपऱ्यात बसू तशी यांची अवस्था झाली आहे. पाहिजे ते मंत्रिपद दिलं नाही रुसले, गेले गावी. दावोसला नेलं नाही रुसले, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू गावात जाऊन बसू पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागले आहेत. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण भ्रमात राहिलो हे सत्य मानलं पाहिजे. आपल्याला वाटलं यांचं गाढव आपण अडवलं आहे आता विधानसभा जिंकलीच पण थोडं नाही म्हटलं तरीही आपण गाफिल राहिलो. असंही उद्धव ठाकरे अंधेरी येथील भाषणात म्हणाले.

Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

मी हिंदुत्व सोडलेलं नाही-उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आपण गाफिल राहिल्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. त्या काळात अपप्रचार करण्यात आला. लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या देशभक्त बांधवांनो म्हणत होतो यात काय चूक केली? हिंदू देशप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी नाहीत का? पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा प्रचार केला. अनिल देसाईंच्या सभेत मी मुस्लिमांना विचारलं होतं की मी हिंदुत्व सोडलं आहे का? त्यावर त्यांनी सांगितलं नाही. माझं हिंदुत्व त्यांनीही मान्य केलं.

बाबरी प्रकरणात मी माफी मागितलेली नाही-उद्धव ठाकरे

एक कुठेतरी बातमी छापून आणली, ९२-९२ ला जे घडलं त्यासाठी माफी मागितली. मी कधी माफी मागितली? माफी उद्धव ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयींनी मागितली होती. बाबरी पाडली ही चूक झाली हे आडवाणी बोलले होते. आता अमित शाह आडवाणी आहेत अजून. त्यांना तुम्ही बाजूला करुन टाकलं आहे. नवाज शरिफच्या वाढदिवसाचा केक मोदी खायला गेले होते उद्धव ठाकरे नाही. लहानपणी मुस्लिमांच्या घरुन मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताजिया खालून मी जायचो हे उद्धव ठाकरे बोलला नाही हे नरेंद्र मोदी बोलले आहेत. ” अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

मोहन भागवत मशिदीत गेले होते, मी नाही-उद्धव ठाकरे

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “माझ्या फोनमध्ये १०० हून अधिक फोटो आहेत. सगळेजण टोप्या घालून बसले आहेत. मोहन भागवत मशिदीत गेले होते, उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. दगाबाजीचा उल्लेख अमित शाह करतात आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहात. प्रजासत्ताक दिन येतो आहे, आपल्या देशाचा तिरंगा आहे पण त्यातही हिरवा रंग आहे. तुम्ही तो तिरंगा तुमच्या कार्यालयावर फडकवत नव्हतात. आमचा झेंडा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, त्याला डाग लावण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. आम्ही देशप्रेमी मुस्लिमांना आमचे मानतोच. पण देशप्रेमी मुस्लिमांना तुमच्याविरोधात आम्हाला मतदान केलं म्हणून तुम्हाला पोटशूळ उठला असेल तर अमित शाह यांना जाहीर आव्हान देतो आहे की भाजपाच्या झेंड्यातला हिरवा रंग काढून दाखवावा त्यानंतर आम्हाला हिंदुत्व शिकवा.

पार्ल्याच्या पोटनिवडणुकीचा उल्लेख करत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पार्ल्याची पोटनिवडणूक १९८७ मध्ये लढली होती ती देशातल्या निवडणुकीच्या इतिहासात हिंदुत्वावर जिंकलेली होती. शिवसेना प्रमुखांनी ते दाखवून दिलं होतं. शिवसेनेच्या विरोधात कोण होतं आणि बरोबर कोण होतं? त्यावेळी बाळासाहेबांची भाषणं आहेत की देशप्रेमी मुस्लिमांचं वावडं नाही, देशाविरोधात हिंदू असला कुरुलकरसारखा तर तो शत्रू आहे. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला अपशकून करायला भाजपाने जनता पक्षाच्या प्राणलाल व्होरांना पाठिंबा दिला होता. जरा हा इतिहासही अमित शाह यांनी तपासावा. का तेव्हा हिंदू म्हणून आमच्या बरोबर आला नाहीत. ती निवडणूक आम्ही जिंकल्यावर प्रमोद महाजन वगैरे सगळे आले. मातोश्रीचे उंबरठे यांनी झिजवले. भाजपा, आरएसएस असेच आहेत काड्या लावायच्या दंगल पेटली की पळून जायचं. बाबरी पडल्यानंतर आम्ही नाही त्यातले म्हणणारे हे होते, आम्ही तुमच्याकडून हिंदुत्व शिकायचं?”असा सवाल उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Story img Loader