शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. आज त्यांनी मातोश्री येथे सायन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनाही इशारा दिला आहे.

जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावं लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.

What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
Amit Thackeray : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
mns mayuresh wanjale
“खडकवासलावर मनसेचा शंभर टक्के झेंडा फडकणार” मनसे उमेदवार मयुरेश वांजळेंचा विश्वास
sanjay raut on dadar mahim amit thackeray
Sanjay Raut : अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “जर…”
MNS Second List Announced
MNS List : मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून, तर वरळीतून आदित्य ठाकरेंना ‘हा’ उमेदवार देणार आव्हान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : “डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला, पण मी त्यांना म्हटलं आधी…”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा- “पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेनं रवाना, आता…”, राज ठाकरेंच्या आरोपाला आव्हाडांचं एका वाक्यात उत्तर

सायन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे की, ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या. माझ्या एक गोष्ट लक्षात येतेय की, कुणीतरी पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येतंय, मग ते उधाण रागाचं आहे… त्वेषाचं आहेय… जिद्दीचं आहे… आपली जिंकण्याची ईर्ष्याही आणखी वाढत आहे. पक्षातून जे गेलेत त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’ आहे. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत.

हेही वाचा- “…तेव्हा मी अमेरिकेत जाऊन बसणार”, बच्चू कडूंचं मोठं विधान

शिंदे गटाला इशारा देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मला आता एवढीच अपेक्षा आहे, त्यांनी (शिंदे गट) तिकडे गेल्यानंतर पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी कामं करू नयेत. नाहीतर आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावं लागेल. कोणत्याही परिस्थितीत आपले बालेकिल्ले राखायला तुम्ही सगळे समर्थ आहात. आता आपल्यात जे भक्तीचं उधाण येतंय, ते पाहून आता त्यांनाच धक्के बसतील. एवढं होऊनही शिवसेना का संपत नाहीये? उद्धव ठाकरे का संपत नाही? असा त्यांना प्रश्न पडेल. प्रत्येक वेळी टीका करताना त्यांना उद्धव ठाकरेंवरच बोलावं लागतं. कारण त्यांना तुमची धास्ती आहे. त्यामुळे एक-एक सहकारी फोडण्यापेक्षा एकदाच निवडणुका घेऊन दाखवा.”