मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आज, रविवारी होणाऱ्या मेळाव्यात नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावर शिक्कामोर्तब केले जाईल. याशिवाय अन्य नेत्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाले. यामुळे ठाकरे गटाला सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल चिन्ह मिळाले आहे. ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी २०१८ मध्ये पाच वर्षांसाठी निवड झाली होती. ही मुदत जानेवारीमध्येच संपली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्या वरळीत होणाऱ्या मेळाव्यात राज्यभरातील प्रतिनिधींच्या सभेत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी फेरनिवड केली जाईल. याशिवाय आदित्य ठाकरे व अन्य नेत्यांची नेतेपदी निवड करण्यात येणार आहे. अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या टप्प्याटप्प्याने केल्या जातील. याशिवाय या वेळी राजकीय ठरावही करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे शिवसेनेची सूत्रे शिंदे गटाकडे गेल्याने ठाकरे गटाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. सध्या हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने नव्याने नियुक्त्या करून शिंदे गटाला इशारा देण्याचा निर्णय घेतला आहे.