उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ( १३ जुलै ) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी जे केले, त्याला बेइमानीशिवाय दुसरे काहीच म्हणता येणार नाही. त्यांनी माझ्या नव्हे, तर भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. बेइमानी होते, तेव्हा कूटनीती वापरावी लागते. महाभारतातही हेच घडलं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याला उद्धव ठाकरे प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. “जनतेच्या खलबत्त्यात चाणक्य आणि त्यांची कूटनीती कुटून बारीक करायची आहे,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर सोडलं आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : “विधानसभा अध्यक्षांकडून निर्णयाची अपेक्षा नाही, कारण…”, संजय राऊत यांची टीका

“अर्धे उपमुख्यमंत्री बोलले राष्ट्रवादीबरोबर युती ही कूटनीती आहे. ही कूटनीती आपल्याला कुटून टाकायची आहे. जनतेचा खलबत्ता किती मोठा आहे, हे यांना कळलं नाही. चाणक्य खलबतं करतो. तर, जनतेचा खलबत्ता असतो. त्या खलबत्त्यात चाणक्य आणि त्यांची कूटनीती कुटून बारीक करायची आहे,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केला आहे.

हेही वाचा : “…त्यामुळे एकनाथ शिंदेंना त्रास होतो”, संजय शिरसाट यांचा भरत गोगावलेंना सल्ला

“देवीनेही त्यांना माफ केले असेल”

“काही लोक पोहरादेवीला जाऊन खोटी शपथ घेतात. पण, त्यांनी खोटी शपथ घेताना देवीची मनातून माफी मागितली असेल आणि देवीनेही त्यांना माफ केलं असेल,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.

Story img Loader