मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी भेट घेतली. दीड तासांच्या या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील आघाडी तसेच सद्यस्थितीतील राजकारणावर उभयतांमध्ये चर्चा झाली. आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्यात झालेली चर्चा महत्त्वाची ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – धारावी पुनर्विकासाच्या कामाला लवकरच सुरुवात, रेल्वे वसाहतीच्या कामासाठी प्रारंभ प्रमाणपत्र प्राप्त

हेही वाचा – म्हाडा कोकण मंडळ सोडत, २२६४ घरांसाठीची ३१ जानेवारीची सोडत पुन्हा पुढे ढकलली

उद्धव ठाकरे, शरद पवार भेटीदरम्यान अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाली असली तरी ही चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नव्हती, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. स्थानिक निवडणुकांबाबत काँग्रेस नेत्यांची काय भूमिका आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक लवकरच आयोजित केली जाईल. त्यात निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटल यांनी सांगितले.