शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यापासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात भाजपा-शिंदे गट एकत्र येत सत्ताशकट हाकत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आपल्या विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. असे असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाशी युती करण्यास आम्ही, तयार आहोत अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर आज (२० नोव्हेंबर) प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत एका मंचावर आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरही भाष्य केले. आम्ही जात-धर्म मानत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही कोणाला जात विचारली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>>> “…म्हणूनच एका व्यासपीठावर येण्यास अडचण आली नाही”, उद्धव ठाकरेंकडून प्रकाश आंबेडकरांचे तोंडभरून कौतुक

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
sushma andhare on uddhav thackeray bag checking
उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या; म्हणाल्या, “जर तुम्ही…”

“आज देश हुकुमशाहीच्या देशाने चालला आहे. त्यांनी चेहऱ्यावर बुरखा लावलेला आहे. स्वत:चा चेहरा दाखवला तर लोक जवळ येणार नाहीत. त्यामुळे मुखवटा घालायचा, मतं मिळवायची आणि राज्य करायचं, असे सुरू आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा, अशी इंग्रजांची नीती देशात राबवली जात आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणाला जात विचारली नाही. आज गोमांस सापडले की माणसांना मारले जाते. तर दुसरीकडे एका महिलेवर अत्याचार केल्यानंतर तसेच तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलांना मारल्यानंतर मारेकरऱ्यांचा सत्कार केला जातो. त्यांना सोडून दिले जाते. तसेच त्यांना उमेदवारी दिली जाते. हे आमचे हिंदुत्व नाही. आम्ही जात-धर्म मानत नाही,” असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा >>>> कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तुमच्या पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जाणार? शिंदे गटाच्या बड्या नेत्याने सांगितलं, म्हणाले “आम्ही सर्व…”

“आदर्श कोणी कोणाला मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. सध्या येथे दोन नातू बोलत आहेत. काही ठिकाणी आजोबा बोलायला लागले आहेत. त्यांचे नातू काय करतील, हे मला माहिती नाही. पण वाट दाखवणारे आदर्श मानायचे की वाट लाणारे, हा मोठा प्रश्न आहे,” अशी मिश्किल टिप्पणीही उद्धव ठाकरे यांनी केली.