बुलढाण्यामधील उद्धव ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांनी काल ‘मातोश्री’ या निवासस्थानी माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी अंधेरी पूर्व मतदारसंघामधील पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार मागे घेण्यासंदर्भात आपण भारतीय जनता पार्टीकडे विनंती का केली नाही याबद्दलचा खुलासा केला. मातोश्रीबाहेरच कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्याबद्दलचं शल्य बोलून दाखवलं.
नक्की वाचा >> “मुंबई पालिकेच्या निवडणुका लवकर लागल्या तर निवडणूक आयोगाला…”; ‘धनुष्यबाणा’संदर्भात उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान
उद्धव ठाकरेंनी आपल्या छोट्याश्या भाषणामध्ये गटाला मिळालेलं नवं चिन्हं हे अंधार संपवणारं असल्याचं म्हटलं. “तुम्ही एवढ्या जिद्दीनं इथं आला आहात. तुम्हाला काही सांगायची गरज नाही,” असं उद्धव यांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी, “साहेब तुम्ही काळजी करु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असं म्हटलं. यावर उद्धव यांनी, “या एका विश्वासावरच मी उभा आहे,” असं उत्तर दिलं. आपल्याला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र त्या सर्व अडचणींना तोडून मोडून तुम्ही ‘धनुष्यबाण’ गोठवलेला असला तरी हातात मशाल घेऊन चालत आहात. प्रत्येक चिन्हाचं एक महत्त्व असतं. ‘धनुष्यबाण’ हा श्रीरामाचा ‘धनुष्यबाण’ होता. त्याच ‘धनुष्यबाणा’ने रावणाला मारलं होतं. मशाल म्हटल्यानंतर अन्याय जाळणारी ही मशाल आहे. तसेच अंधारात वाट दाखवणारी मशाल. ही मशाल घेऊन आपण पुढे जात आहोत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
निवडणूक आयोगाचा केवळ ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचा आदेश हा तात्पुरता असल्याचा उल्लेखही उद्धव यांनी केला. “निवडणूक आयोगाने चिन्हासंदर्भातील आदेश काही काळापुरता दिला आहे. एकदा आपण वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आपलं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळणार आहे. बाकी जे बोलायचं आहे ते मी दसरा मेळाव्यात बोलेलो आहे. जाहीर सभेत पुन्हा बोलणार आहे,” असं उद्धव म्हणाले.
नक्की वाचा >> पुणे तुंबण्यासाठी राष्ट्रवादीच जबाबदार! पाकलमंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा; म्हणाले, “पालिकेत भाजपाची सत्ता असूनही…”
अंधेरीच्या पोटनिवडणुकीमधून भाजपाने पळ काढला असं म्हणताच उद्धव ठाकरेंनी आपण उमेदवार मागे घेण्यासंदर्भात तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात भाजपाकडे विनंती का केली नाही याबद्दलही भाष्य केलं. ज्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं त्यांच्याकडे कशासाठी विनंती करावी असा सवाल उद्धव यांनी विचारला. “अंधेरीची पोटनिवडणुक ही बिनविरोध होणार नाहीय. तिथे निवडणूक होणार आहे. त्याबद्दलसुद्धा काहीजणांना वाटतं मी विनंती केली नाही. का विनंती करु? माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं. एवढं करुन उमेदवारीनंतर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला. मग केलं कशाला हे सगळं काही? केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा. शिवसेना संपवायची या हेतूने हे सुरु आहे.
नक्की वाचा >> संजय राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी केली चित्रा वाघ यांची नक्कल; BJP उपाध्यक्षांना लक्ष्य करताना म्हणाले, “पूजा चव्हाणला…”
यावेळेस शिवसेनेचे आमदार राजन साळवीसुद्धा उपस्थित होते. साळवी यांना अनेक आमिषं दाखवण्यात आली पण ते डगमगले नाहीत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलं.