Dasara Melava 2022 Latest News : मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच आज दोन दसरा मेळावे मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला पाहायला मिळाले. एकीकडे उद्धव ठाकरेंचा तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा मुंबईत पार पडला. उद्धव ठाकरेंनी मेळाव्यातील आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे, शिंदे गटातील बंडखोर यांच्यासोबतच भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही तोंडसुख घेतलं. यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी भूमिका मांडली. तसेच, देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा आरोपही त्यांनी भाजपावर केला.

“…तर हे जय श्रीराम म्हणतील”

“तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला ना. महागाईच्या वेदना लोकांना जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस द्यायचा. जनता महागाईवर बोलली, तर हे जय श्रीराम म्हणतील. ह्रदयात राम आणि हाताला काम पाहिजे. पण हे महागाईवर बोलत नाहीत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आरएसएसच्या होसबाळेंनी भाजपाला आरसा दाखवला आहे. त्यात काहीतरी सुधारणा होईल अशी आशा आहे. नाहीतर आरशात बघून स्वत:च भांग पाडत बसतील”, असा टोलाही त्यांनी लगावला.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…
Astrological predictions 2025 for Uddhav Thackeray in Marathi
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
Narendra Modi Slams Uddhav Thackeray
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला, “राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा…”
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Dasara Melava 2022 : “माझं त्यांना आव्हान आहे, एकाच व्यासपीठावर..”, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान!

मोहन भागवतांचं नाव घेत टीकास्र

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांचं नाव घेत भाजपावर टीकास्र सोडलं. “मोहन भागवत मध्यंतरी मशिदीत जाऊन आले. मग काय त्यांनी हिंदुत्व सोडलं? की मिंधे गटानं नमाज पढायला सुरुवात केली? मोहन भागवत संवाद करायला गेले होते. तेव्हा मुसलमानांनीच सांगितलं की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. आम्ही जेव्हा सांगितलं मोहन भागवतांना राष्ट्रपती करा, तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. ते मुसलमानांसोबत बोलायला गेले तर म्हणे त्यांचं राष्ट्रकार्य सुरू आहे. पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं. कुठले धागेदोरे कशाशी जोडताय?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला.

याकूब मेमनच्या कबरीच्या मुद्द्यावरूनही डागली तोफ!

दरम्यान, मुंबईतील याकूब मेमनची कबर सजवल्याचा आरोप झाल्यानंतर त्यावरून मध्यंतरी वाद झाला होता. त्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं आहे. “कुणाच्यातरी थडग्यावर जाऊन बोलायचं की हे थडगं बघा कसं सजवलंय. पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारी तुमची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं का? नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तीच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?” असे थेट प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारले आहेत.

Dasara Melava 2022 Live : “..तर पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन”, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात निर्धार!

“अमित शाह देशाचे मंत्री की भाजपाचे घरगुती मंत्री?”

“अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपाचे घरगुती मंत्री हेच कळत नाहीये. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, इकडे काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड असं चाललंय त्यांचं. मुंबईत येऊन म्हणे शिवसेनेला जमीन दाखवा. बघा आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत. मी आज त्यांना आव्हान देतोय की आम्हाला जमीन बघायचीच आहे. ती पाकव्याप्त काश्मीरची जमीन जिंकून दाखवा. हिंमत असेल तर तिथली एक फूट जमीन जिंकून दाखवा. ती आमची मातृभूमीच आहे. ८ वर्षं झाली. मोदींच्या मुलाखती आजही ऐकतोय आम्ही. पाकिस्तानको उनकी भाषा में उत्तर देना चाहिये. कोणती भाषा?”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही तुकडा परत घेऊ शकला नाहीत. चीन लेह, लडाखमध्ये घुसतंय. ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाल डोक्यावर घेऊन नाचू, हे कशाला हवेत गद्दार. गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय? पण तिकडे शेपट्या घालायचे आणि इकडे येऊन पंजे काढायचे ही काय मर्दुमकी आहे?” असंही ते म्हणाले.