मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नवे चिन्ह ‘मशाल’च्या प्रचारगीतामध्ये असलेले ‘हिंदूू’ आणि ‘भवानी’ हे दोन शब्द काढून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. हे शब्द हटविणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र आयोगाच्या नोटिशीमुळे हिंदूत्वाच्या मुद्दयावर आक्रमक भूमिका घेण्यास ठाकरे यांना आयती संधी मिळाली आहे.

हेही वाचा >>> निवडणुकीत ठाकरे गटाच्या हाती नव्याने हिंदूत्वाचा मुद्दा

will Mahavikas Aghadi hit by Maratha Shakti experiment in 120 constituencies in assembly election
१२० मतदारसंघांत ‘मराठा शक्ती’च्या जरांगे प्रयोगाचा महाविकास आघाडीला फटका?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Chandrashekhar Bawankule, Candidates, merit,
बावनकुळे म्हणाले, उमेदवारांचा निर्णय जातीच्या आधारावर….
Prashant Pawar said that we have not come to campaign with flag of BJP in mahayuti
“भाजपच्या प्रचारासाठी आम्ही महायुतीत आलो काय ?” अजित पवार गटाच्या नेत्याने सुनावले
nitin Gadkari controversial statement
गडकरींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपपुढे पेच, प्रचारात सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नात अडचणी
Arvind Kejriwal
हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
Jat Assembly constituency
सांगली : जतमध्ये भाजपाच्या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरून वादावादी

ठाकरे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी ‘मशाल’ चिन्ह मिळाले आहे. या चिन्हावर आधारित प्रचारगीत शिवसेनेने प्रसिद्ध केले. त्यात ‘हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म’ अशी ओळ आहे. निवडणूक आयोगाने ‘हिंदू’ शब्द काढण्यास सांगितला आहे. याच गीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ या जयघोषातील भवानी शब्दावरही निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे. त्यावर ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन जोरदार तोफ डागली. मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतील विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय बजरंग बली बोला आणि बटण दाबा’ असे सांगितले होते. गृहमंत्री अमित शहा यांनीही मध्य प्रदेशमध्ये आयोध्येत रामलल्लाचे मोफत दर्शन हवे असेल तर भाजपला निवडून दया’ असे वक्तव्य जाहीर सभेत केले होते. आम्ही हिंदूंच्या नावाने मते मागितलेली नसतानाही भाजपचा नोकर असल्याप्रमाणे वर्तवणूक असलेल्या निवडणूक आयोगाने शब्द काढायला सांगणे, हा अन्याय आहे असे ठाकरे म्हणाले. आमच्यावर कारवाई करण्याअगोदर मोदी व शहा यांच्यावर आयोगाला कारवाई करावी लागेल, असे ठाकरे यांनी ठणकावले.

साधे उत्तरही दिले नाही

मोदी यांच्याकडून बजरंगबलीची घोषणा आणि शहा यांच्याकडून रामलल्लाच्या दर्शनाचे आमिष दाखविल्यावरून ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठविले होते. देवदेवतांच्या नावे मत मागण्याची मुभा पंतप्रधान व गृहमंत्र्यांना देण्यात आली आहे का? तसे असल्यास आम्हीही देवदेवतांच्या नावे मत मागू, असे या पत्रात म्हटले होते. मात्र निवडणूक आयोगाने या पत्राला साधे उत्तरही दिले नसल्याचा दावा ठाकरे यांनी केला.

भवानी माता महाराष्ट्राची कुलदेवता आहे. तिचा अपमान सहन केला जाणार नाही. हा शब्द आम्ही ठेवणार आणि बोलणार. आयोग उद्या ‘शिवाजी’ शब्दावरही आक्षेप घेईल. ही हुकूमशाही स्वीकारणार नाही. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)